...मग राष्ट्रमाता कोण?
कोणाची कोणाशी तुलना करावी याचेही आजकाल लोकांना भान राहिलेले नाही. अगदी शिकले सवरले लोकही तोंडाला येईल ते वाटेल तसे बोलतात. मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस या तशा वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गायकीमुळे, कधी अमिताभ बरोबर काढलेल्या म्युझिकल अल्बममुळॆ तर कधी त्यांच्या ऍक्सेस बँकेत सरकारने पोलिसांचे पगार टाकल्यामुळे! ठीक आहे एखाद्या माणसाला ग्लॅमरस जीवनाची आवड असते. त्यामुळे काहींना काहीतरी करून चर्चेत राहावे लागते. पण ज्या गोष्टीची फारशी माहिती नाही किंवा अशा गोष्टींबाबत काही विधाने केल्यास त्याचे किती विपरीत परिणाम होऊ शकतात याची अमृता ताईंना थोडी तरी समज असायला हवी होती. पण त्यांना तशी समाज नसल्यामुळेच त्यांनी नरेंद्र मोदींची थेट गांधीजींशी तुलना करून मोदींना राष्ट्रपिता म्हटले आहे. मोदी आज प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. पण त्यांना संपूर्ण देशवासीयांनी आपला नेता म्हणून अजूनही मनापासून स्वीकारलेले नाही. आजही मोदींच्या टीकाकारांची संख्या काही कोटींच्या घरात आहे. यात हिंदुधर्मीयही आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना राष्ट्रपिता म्हणण्यासारखे त्यांनी या देशासाठी काय केलेय? २०१४ मध्ये लोकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी लोकांना १५ पैसेही दिले नाहीत. महिलांच्या सुरक्षेबाबत मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या मोदींची पत्नी आज सौभाग्यवती असूनही विधवेसारखं एकाकी जीवन जगत आहे. पाकिस्तानच्या दहशतवादा विरुद्ध सतत आवाज उठवणाऱ्या मोदींच्या पक्षाने मालेगाव बॉम्ब स्फोटाची आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूर हिला निवडून आणले आणि आज तीच प्रज्ञा ठाकूर ज्याने छातीवर गोळ्या झेलून मुंबई वाचवली त्या शाहिद हेमंत करकरे विरुद्ध गरळ ओकतेय. आणि देशभक्तीचा ढोल वाजवणारे मोदी आणि त्यांचे चेले चपाटे गप्प आहेत. कारण प्रज्ञा ठाकुरच्या या कृत्यांना मोदींची मूक संमती आहे. गुजरात दंगलीतील लोकांचे आत्मे आजही न्यायासाठी भटकटत आहे. पण त्यांना न्याय मिळेनासा झालाय कारण दंगलीत ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्याच हाती सत्ता असल्याने न्याय मिळणार कसा? या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मोदींना राष्ट्रपिता कोण म्हणेल? मोदींना राष्ट्रपिता म्हटले तर राष्ट्रमाता कोण इंदिरा गांधी,सोनिया गांधी,की ममता बॅनर्जी? आज या देशात असा एकही नेता नाही की ज्याला आदराने राष्ट्रपिता म्हणता येईल किंवा राजकारणात एकही महिला नाही अशी जिला राष्ट्रमातेचा दर्जा देता येईल आणि हीच वस्तुस्थिती अमृता फडणवीस यांनी समजून घ्यावी .मोदी सारख्या लोकांना राष्ट्रपिता म्हणणे म्हणजे खरे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करण्यासारखे आहे. महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य चळवळीला वाहून घेतले होते .ते बॅरिस्टर असूनही त्यांनी कधी अंगावर ५ कोटींचा सोडाच ५ हजारांचाही सूट घातला नाही. ते देशासाठी जगले आणि देशासाठी मेले पण देशासाठी शाहिद झालेल्या या महात्म्यावर आजही चिकलफेक केली जातेय. त्याच्या तसबीरीवर हिंदुत्ववादी गोळ्या झाडत आहेत. गांधीजींचा पळपुटा आणि नपुंसक मारेकरी नथुराम गोडसेच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जात आहेत आणि हे सगळं मोदी आणि त्यांचे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. मग अशा लोकांना देशवासीयांनी राष्ट्रपिता म्हणायचे का ?अमृता फडणवीस यांनी स्वातंत्र्य चळवळीचा आणि गुजरात दंगलीचाही इतिहास वाचावा म्हणजे त्यांना कळेल की आपली काय चूक झाली? कुणालाही कुणाची उपमा देणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. तेंव्हा राजकारणा पेक्षा आपल्या संसाराकडे अधिक लक्ष द्या आणि त्यातून वेळ मिळाला तर समाजकारण करा. मात्र वादग्रस्त विधाने करून नेटकऱ्यांच्या टीकेचे लक्ष होऊ नका.
या देशात एकच राष्ट्रपिता होऊन गेलेत आणि ते म्हणजे मोहनदास करमचंद अर्थात महात्मा गांधी त्यांच्या महान कार्याची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही, मोदींशी तर नाहीच नाही. कारण मोदी आणि गांधींमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. जो प्रेम आणि सदभाव महात्मा गांधी यांच्यात आहे तो मोदी यांच्यात नाही म्हणूनच ते राष्ट्रपिता होऊ शकत नाहीत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम