निवडणुकीचा निकाल लागला आता पुढे काय?

निवडणुकीचा निकाल लागला मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने पुन्हा एकदा निर्विवाद बहुमत मिळवले. त्यामुळे आता हिंदुत्ववाद्यांना आणखी बळ मिळाले आहे तर दुसरीकडे दलित मुस्लिम आणि बहुजन समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे .कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या दबावाखाली मोदी कोणताही मोठा निर्णय घेऊ शकतात कारण विकासाच्या अजेंड्याबद्दल बोलणाऱ्या मोदींनी साध्वी प्रज्ञा सिंग हिच्यासारख्या हिंदू दहशतवादी महिलेला तिकीट देऊन आणि निवडून आणून आपला खरा चेहरा हा हिंदुत्ववादीच असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता खरा धोका आहे तो संविधानाला कारण आजवर भाजपातील लोक दबक्या आवाजात संविधान बदलण्याची भाषा करीत होते आता मात्र साध्वी प्रज्ञासिंग, साक्षी महाराज यासारख्या जहाल हिंदुत्ववादी खासदारांच्या तोंडून थेट संसदेत ही मागणी केली जाऊ शकते. दुर्दैवाने त्याला प्रखरपणे विरोध करण्यासाठी यावेळी संसदेत प्रबळ विरोधी पक्षात नसल्याने मोदी बहुमताच्या जोरावर काहीही करू शकतात. त्यामुळे आता पुढे काय असा गंभीर प्रश्न या देशातील दलित मुस्लिम आणि बहुजन समाजा समोर राहिला आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने काँग्रेस आणि इतर भाजप विरोधक एवढे गर्भगळीत झालेत की या धक्क्यातून सावरायला त्यांना आणखी काही दिवस लागतील त्यामुळे पुढे काय वाढून याविषयी लोकांमध्ये चिंता आहे. या देशात दलित मुस्लिमांची संख्या निर्णायक पण त्यांच्याकडे प्रभावी नेतृत्व नसल्याने आणि मुख्य म्हणजे हा एवढा मोठा समाज गटातटात आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेला असल्याने त्यांची वाईट अवस्था आहे.याउलट राम मंदिर सारख्या किंव्हा तत्सम धार्मिक मुद्द्यावर हिंदू समाज एकजूट होतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादाचा जो संवेदनशील मुद्दा आहे त्या मुद्द्यावर हिंदू जनमत संग्रहित करण्याची एक विलक्षण कला हिंदुत्ववाद्यांमध्ये आणि याच आधारावर मोदींनी लोकसभेची निवडणूक जिंकली. मग जी गोष्ट मोदींसारख्या हिंदुत्ववाद्यांना जमली ती दलित मुस्लिम किंवा बहुजन समाजाला का जमली नाही. उलट हिंदूंमध्ये जे पुरोगामी आहेत त्यांनी नेहमीच कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात भूमिका घेतली असल्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हिंदुत्ववाद्यांना डोके वर काढता आले नाही. अगदी शिवसेनेची संघटनात्मक ताकद  असतानाही बाळासाहेबांना स्वबळावर महाराष्ट्र जिंकता आला नाही.मात्र भाजपने शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात प्रवेश केला आणि भटाला दिली ओसरी तो हातपाय पसरी या म्हणीनुसार त्यांनी हळूहळू हातपाय पसरले..आज सत्ताधारी झाले तेंव्हा जे हिंदुत्ववाद्यांना जमले तेच आता दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाने करून दाखवायला हवे त्यासाठी काँग्रेससह सर्वच भाजप विरोधी पक्षांनी या कामी आपापसातले मतभेद विसरून पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा दलित मुस्लिमांसाठी या देशात खूप अवघड परिस्थिती असेल. येत्या काही महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे ही निवडणूक विरोधकांसाठी आणि दलित मुस्लिम तसेच बहुजन समाजासाठी   अस्तित्वाची लढाई असेल. तेंव्हा पुढे काय? अस्तित्व टिकवायचे की बामणी सत्ताधाऱ्यांना जोहार करून गुलामीत जगायचे याचा विचार सर्व उपेक्षित समाजाने आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या भाजपा विरोधी पक्षांनी करावा.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट