
बंगालमधील 'वणवा'
- by Editor
- May 17, 2019
- 1513 views
निवडणुकांमधील हिंसाचार हा या देशात काही नवा नाही. अगदी उमेदवाराचे अपहरण करण्यापासून ते बूथ जाळणे, मतपेट्या पळवणे, मतदारांना धमकाविणे या सर्व गोष्टी निवडणुकीचाच एक भाग आहे. त्यामुळे लोकांनाही त्याबाबत काही विशेष वाटत नाही. खरे तर लोकशाहीत अशा हिंसाचाराला थारा नाही. पण हे सगळं थांबवण्याची जबाबदारी ज्या राजकीय पक्षांवर आहे त्यांनीच राजकारणाचे गुन्हेगारीकरण घडवलेले असल्याने निवडणुकांमधील हिंसाचारावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकारच राहिला नाही. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचारात कोलकाता येथे जे काही घडले ते कितीही निषेधार्ह असले तरी ते अनपेक्षित नव्हते, कारण सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस मध्ये जो खुनी संघर्ष सुरू आहे त्याचाच प्रत्यय कलकत्त्याच्या रस्त्यावर भाजप अध्यक्षांना आला आणि दोन्ही पक्षांच्या लोकांनी एकमेकांची डोकी फोडली. मात्र या संघर्षात सर्वसामान्य लोकांना ओढण्यासाठी बंगालमधील थोर सामाजिक कार्यकर्ते विद्यासागर यांची मूर्ती फोडण्यात आली. ती कोणी फोडली याची चौकशी सुरू आहे पण नेते ,समाजसुधारक, आणि देवीदेवता यांचे पुतळे हे लोकांच्या अस्मितांचे केंद्रबिंदू असतात. त्यामुळे लोकभावना भडकवण्यासाठी पुतळ्यांना टार्गेट केले जाते आणि त्यातून दंगली उसळतात. विद्यासागर यांचा पुतळा तोडणाऱ्यांचा हाच दुष्ट हेतू होता सुदैवाने तसे काही घडले नाही. केवळ अमित शहांच्या रोड शोमध्येच हिंसक प्रकार घडला पण त्याचे लोण जर संपूर्ण बंगालमध्ये पसरले असते तर परिस्थिती आणखी चिंताजनक झाली असती आणि त्यात आशा घटनांशी ज्याचे काहीही घेणेदेणे नाही अशा सामान्य माणसाचे नुकसान झाले असते. पुतळे फोडून दंगली भडकावणाऱ्यांना सामान्य लोकांशी काही घेणेदेणे नसल्याने ते स्वतःच्या स्वार्थासाठी असे वणवे पेटवून बाजूला होतात. ईशान्यकडच्या जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये अशी स्फोटक स्थिती आहे. पूर्वी तिथे माओवादी निवडणुकांमध्ये हिंसाचार घडवत होते आणि आता राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही माओवाद्यांपेक्षा हिंसक बनत आहेत. पश्चिम बंगाल हे तर संवेदनशील राज्य आहे कारण पाकिस्तानच्या फाळणीनंतर बांग्लादेशमधी मोठ्या प्रमाणावर शरणार्थी भारतात आले आणि त्यांनी आसाम व पश्चिम बंगालमध्ये आसरा घेतला त्यात काही गुन्हेगार होते त्यांनीच पश्चिम बंगाल आणि आसाम मधली परिस्थिती चिघळवली. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ रे असोत की डाव्या कम्युनिस्टांचे ज्योतिबाबू असोत प्रत्येकांनी या घुसखोर बांग्लादेशीना चुचकारून आपली ताकद वाढवली. त्यानंतर आता ममता बॅनर्जीही तेच करीत आहेत मंगळवारी कलकत्त्याच्या रस्त्यावर याच लोकांनी हिंसक हैदोस घातला. अर्थातच पश्चिम बंगालमधील ९ मतदारसंघात होणाऱ्या सातव्या टप्प्याच्या निवडणुकीवर परिणाम झाला. निवडणूक आयोगाला ३२४ कलमाचा वापर करावा लागला देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडले निवडणुकीचा प्रचार एक दिवस अगोदर थांबवावा लागला. आता तृणमूल आणि भाजप एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करीत आहेत पण या निवडणूक संघर्षात दोघेही तितकेच दोषी आहेत. भाजपला पश्चिम बंगालमध्ये ममताची सत्ता उलथवून तेथे भाजपचे कमळ फुलवायचे आहे. पण ते वाटते तितके सोपे नाही कारण पश्चिम बंगालमधील कम्युनिस्टांचे उच्चाटन करण्यासाठी ममतालाही खूप पापड बेलावे लागले तेंव्हा कुठे ज्योतिबाबूंची 35 वर्षांची राजवट संपुष्टात आली. त्यामुळे मोठ्या कष्टाने मिळवलेली सत्ता ममता सहजासजी हातची जाऊ देणार नाही. पण मोदी-शहाना संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घ्यायचा आहे त्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जायची त्यांची तयारी आहे. पण गुजरात दंगलीत या दुकलीचा भेसूर चेहरा पश्चिम बंगालच्या लोकांनीही पाहिलाय. त्यामुळे पश्चिम बंगाल मधील लोक आणि खासकरून ममता, मोदी आणि त्यांचे क्रिमिनल साथीदार शहांचे स्वप्न साकार होऊ देणार नाहीत. पश्चिम बंगाल हा बुद्धिवाद्यांचा आहे. इथे रवींद्रनाथ टागोरा सारखे अनेक बुद्धिमान साहित्यिक, विद्यासागरांसारखे सामाजिक कार्यकर्ते आणि बिमलदा सारखे कला क्षेत्रातले अनेक दिग्गज होऊन गेले. त्यांचा प्रभाव आजही बंगाली जनतेवर असल्यामुळे तिथे हिंदुत्ववादी भाजपची डाळ कदापि शिजणार नाही. त्यामुळे मोदी-शाह यांनी कितीही टि-या बडविल्या तरी पश्चिम बंगालमध्ये कदापि कमळ फुलणार नाही.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम