खारघर राष्ट्रवादी शहर समाजभूषण सुरेशभाऊ रांजवण यांची अध्यक्ष पदासाठी निवड

नवी मुंबई (पनवेल) : महाराष्ट्राचे जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक  माननीय शरद पवार साहेब यांच्या विचारांने प्रेरित झालेले व आम.मानसिंगराव नाईक यांचे समर्थक,आहेत व त्याच्या

सानिध्यात राहून त्यांनी शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आपला दबादबा तयार करुन गोरगरिबांची कामे केली. तसेच नवी मुंबई खारघर या शहरासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन विविध क्षेत्रात समाजपयोगी उपक्रम राबवून गोर-गरिब व होतकरु जनतेची व गरजूंना मदत करण्याची शिकवन भाऊंना  लहानपणा पासूनच उपजत होती.

साईदत्त परिवाराचे शिल्पकार,गोरगरिबांना सदैव मदत करणारे सुरेश भाऊ रांजवण यांची नवी मुंबई खारघर शहर अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सतत लोकांच्या मदतीला धावणारे,सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असलेले मनमिळावू स्वभावाचे रांजवण यांनी आजपर्यंत अनेक गरजूंना, रुग्णांना, सढळ हस्ते मदत केली आहे.आपल्या गावची जि.प.शाळा दत्तक घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.त्याचबरोबर त्यांनी जन्माला येणाऱ्या मुलींना जगवले पाहिजे त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून मुलगी जन्मताच तिच्या नावे पोस्टात काही रक्कम जमा करण्याचा संकल्प केला असून तो  सद्या राबवत देखील आहेत.शिराळा तालुक्यातील इतरांना  लाजवेल अशी त्यांची ओळख सर्व परिचित आहे.त्यांना आजतोपर्यंत राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या बाबींचा विचार करून राष्ट्रवादी खारघर यांनी त्यांना ही शहर अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.

संबंधित पोस्ट