वसई-विरार . ५६३ इमारती धोकादायक संक्रमण शिबिरांचीही वाणवा

विरार (दीपक शिरवडकर) : कोपरी येथील नित्यानंद धाम इमारतीचा काही भाग दि.१६/१०/२०१९ रोजी कोसळून भूमि पाटील नावाच्या मुलीचा जीव गेला होता. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज येथे जुलैमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला होता.ऑगस्टमध्ये काजूपाडा येथील महावीर चाळ खचली.आता सप्टेंबर २०२० ला नालासोपाऱ्यातच साफल्य इमारत कोसळली.त्यामुळे वसई-विरारमधील अंदाजे १८० इमारती कधीही कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
          
वसई-विरार पालिकेने आतापर्यंत ५६३ इमारतींची धोकादायक म्हणून नोंद केली असून नोटीसाही बजावल्या आहेत. रहिवाशांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. कोरोना-पाऊस आणि गेलेले रोजगार या गर्तेतील रहिवाशी अशा धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत धरून रहात आहेत. त्यातच उपनिबंधक-सहकारी संस्था-वसई विभागाने सक्षमपणे तपासणी न करता खोटया कागदपत्राने हौसिंग सोसायटया नोंद केलेल्या असल्याने अशा इमारतींमधील रहिवाशांसमोर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
          
दरवर्षी पालिका धोकादायक इमारतींची यादी तयार करून नोटिसा बजावण्याचे सोपस्कार करण्यापलिकडे काहिही करत नाही. तर दुसरीकडे संक्रमण शिबिराचाही वाणवा आहे. धोकादायक इमारतीचा पुर्णविकास तातडीने करण्याकरता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यानी लक्ष घालून दिलासा द्यावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत.

संबंधित पोस्ट