मानवी क्रौर्याची परिसीमा; आंध्र प्रदेशात गरोदर गायीवर बलात्कार
- by Adarsh Maharashtra
- Dec 26, 2018
- 1880 views
काही दिवसांपूर्वी मालवणी, मुंबई येथे एका कुत्रीवर काही अज्ञातांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. तशीच एक आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात अत्यंत लज्जास्पद घटना घडली आहे. अज्ञात नराधमांनी एका गायीवर बलात्कार केल्याचे समोर येत आहे. पीडित गाय तीन महिन्यांची गरदोर आहे. शेतकर्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गाय मालकाचे नाव राजू असे आहे. राजूने सांगितले की, तो सकाळी उठला असता. गोठ्यात त्याला गाय दिसली नाही. त्याने सर्वत्र गायीचा शोध घेतला. मात्र, गाय दिसून आली नाही. काही अंतरावर असलेल्या शेतात एका झाडाला गाय बांधलेली दिसली. गायीच्या गुप्तांगातून रक्त भळभळत होते.
राजूने गायीला तत्काळ डॉक्टराकडे नेले. गायीवर बलात्कार झाल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला. नंतर राजूने पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविली. ही घटना परिसरात वार्यासारखी पसरली. या घृणास्पद घटनेचा स्थानीय लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. नराधमांना अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम