मध्यप्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांचा शपथविधी; सत्तेत येताच कर्जमाफी

छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शपथविधीचे ठिकाण बदलण्यात आले. बलबीर सिंह जुनैजा इनडोअर स्टेडियममध्ये हा सोहळा संपन्न झाला. भूपेशसिंह बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळीही राहुल गांधी, मनमोहनसिंह यांच्यासह महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

भोपाळ - काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड झालेल्या कमलनाथ यांनी मध्यप्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भोपाळच्या जंबुरी मैदान येथील सोहळ्यात त्यांना शपथ दिली. कमलनाथ राज्याचा कारोभार स्वीकारल्यानंतर सर्वात पहिला मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेणार आहेत. पण शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यास विरोध दर्शवला आहे. न्यायालयाने या दंगलीप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी जन्मठेप सुनावली आहे.


या सोहळ्याला कांग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, रजीव शुक्ला, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मल्लिकार्जुन खरगे, राजीव शुक्ला, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या, मंत्री डी शिवकुमार, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री अशोक गहलोत, उप-मुख्यमंत्री सचिन पायलट, आनंद शर्मा, राज बब्बर, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेन्द्र हुड्डा, त्यांचा मुलगा खासदार दीपेंदर हुड्डा, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, अजय सिंह, अरुण यादव, कांतिलाल भूरिया, नवज्योतत सिंह सिद्धू, विवेक तन्खा उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या काँग्रेसनं मध्य प्रदेशात सत्तेत येताच आश्वासनं पाळण्याच्या दिशेनं पहिलं मजबूत पाऊल टाकलं आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाइलवर स्वाक्षरी केली असून, सरकारी आणि सहकारी बँकांद्वारे शेतकऱ्यांना दिलेलं २ लाखांपर्यंतचं पीक कर्ज माफ होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. राज्यात काँग्रेसचं सरकार निवडून आलं तर, १० दिवसांत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, असं ते म्हणाले होते. हे आश्वासन काँग्रेसनं सत्तेत आल्यानंतर पाळलं आहे. कमलनाथ यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच, शेतकरी कर्जमाफीच्या फाइलवर सही केली. तसंच कन्या विवाह योजनेनुसार देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करून ५१ हजार रुपये करण्यात आली आहे. राज्यात चार गारमेंट पार्क निर्मितीलाही मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आधी कर्जमाफीच्या फाइलवर स्वाक्षरी केली. जे आश्वासन दिलं होतं, ते पाळलं आहे, असं कमलनाथ म्हणाले. यानंतर काही वेळानं राहुल गांधी यांनी ट्विट करत 'मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. एकानं केलं, अजून दोन आहेत,' असं म्हटलंय.



छत्तीसगडमध्ये सायंकाळी झाला शपथविधी
छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शपथविधीचे ठिकाण बदलण्यात आले. बलबीर सिंह जुनैजा इनडोअर स्टेडियममध्ये हा सोहळा संपन्न झाला. भूपेशसिंह बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळीही राहुल गांधी, मनमोहनसिंह यांच्यासह महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.


शपथविधीत महाआघाडीचे शक्तीप्रदर्शन 

                                                                                                                                                                                           राकाँ : शरद पवार, प्रफुल्ल पटेल
टीडीपी : चंद्राबाबू नायडू
लोजद : शरद यादव
नॅशनल कॉन्फ्ररन्स : फारुक अब्दुल्ला
झारखंड मुक्ती मोर्चा : हेमंत सोरेन
द्रमुक : स्टॅलिन, कनिमोळी आणि टीआर बालू
टीएमसी- दिनेश त्रिवेदी
जेडीएस : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी
राजद : तेजस्वी यादव
झारखंड विकास मोर्चा : बाबूलाल मरांडी

भाजपच्या या नेत्यांची उपस्थिती

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट