गुजरात राज्यातील भामट्यांना रबाळे पोलीस सायबर क्राईम पथकाने गुजरात येथून केली अटक !

नवी मुंबई : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून मोठ्या प्रमाणात नफा कमवा असा फ्लॅश मेसेज गुजरात राज्यातील वडनगर मेहसाणा येथील भामट्याने केल्याने ऐरोली येथील राहणारा योगेश पाटील या इसमाला तब्बल ४ लाख ८० हजार २१० इतक्या रकमेला फसवणाऱ्या गुजरात राज्यातील भामटे रोहितजी रमतुजी थाकोर, वय वर्ष (२५) व आरोपी कवडाजी बालाजी ठाकोर वय वर्ष (२८) यांना रबाळे पोलीस ठाण्याच्या सायबर गुन्हे शाखेने गुजरात राज्यातील वडनगर मेहसाणा या ठिकाणाहून जेरबंद केले आहे या कामगिरी बाबत  सायबर क्राईम पोलिसांचे नागरिकाकडून कौतुक होत आहे

याबाबत हकीकत अशी की आरोपींनी ऐरोली येथे राहणाऱ्या योगेश पाटली यास व्हाट्सअप द्वारे संदेश पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा कमवा असा फ्लॅश मेसेज केला होता त्यानुसार  फिर्यादी योगेश पाटील यांनी आधार कार्ड फोटो व इतर डिटेल्स दिल्याने या भामट्या आरोपींनी योगेश पाटील यांचे स्पेशल अकाउंट ओपन केले  त्यात प्रथम छोट्या रकमेची गुंतवणूक करायला सांगून त्या रकमेद्वारे योगेश पाटील यांना मोठा नफा झाल्याचे व्हाट्सअप द्वारे स्क्रीनशॉट दाखवून आपण कसे प्रामाणिक काम करत आहोत असे भासविले  या अमिषाला योगेश पाटील बळी पडून त्यांनी आरोपींच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी पैसे भरले मात्र दिले गेलेली रक्कम रिटर्न विड्रॉल करण्यास सांगितले असता आरोपीने आणखी स्टॉक विकत घेण्यास सतत तगादा लावला रक्कम भरल्या नंतरच स्टॉक चे रिटर्न भेटेल असे आरोपी हे फिर्यादी योगेश पाटील यांना वारंवार सांगत असत याबाबत फिर्यादी योगेश पाटील यांना संशय आल्याने त्यांनी रबाले पोलीस ठाण्यात धाव घेतली रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सदरचा तपास सायबर क्राईम पथकाकडे वर्ग केला त्यानुसार सायबर क्राइम पथकाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक थिटे व रबाळे सायबर तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांनी तांत्रिक तपास करून गुजरात राज्यातील भामट्यांना गुजरात मधील वडनगर मेहसाणा या ठिकाणी जाऊन त्यांच्या मुस्क्या आवळण्यात यश प्राप्त केले आहे

दरम्यान : आरोपीकडून दोन मोबाईल दोन सिम कार्ड हस्तगत केले असून आरोपी रोहितजी रमतुजी थाकोर यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक थिटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या कारवाई दरम्यान  पोलीस शिपाई भोपी, पोलीस शिपाई राळे, यांनी मेहनत घेतली

मोबाईल द्वारे किंवा  फेसबुक द्वारे ओळख करून कोणत्याही प्रकारचे आर्थिक देवाण-घेवाण न करता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री.संजीव धुमाळ यांनी केले आहे

संबंधित पोस्ट