मोक्का अंतर्गत जामिनवर सुटका झालेल्या आरोपीसह गोळीबार करून फरार आरोपींना ऐरोली येथून अटक !

आरोपींना रबाले पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या केले स्वाधीन !

नवी मुंबई :  मोक्का सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याखाली व जामिना अंतर्गत सुटका झालेल्या आरोपीस इतर दोन आरोपींना रबाले पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे  मोक्का अंतर्गत जामिनवर सुटका झालेल्या आरोपीचे नाव सुरज कावळे वय वर्ष (२५) आरोपी मोक्का अंतर्गत जमिनावर बाहेर आहे.

 आरोपी साहिल बागडे वय वर्ष (२२) आरोपी पियुष वहाने वय वर्ष (२८) असे असून सर्व आरोपी राहणार खापरखेडा तालुका सावनेर जिल्हा नागपूर हे  आरोपी या गावाचे राहणारे आहेत. या आरोपींनी नागपूर खापरखेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गोळीबार करून खूनाचा प्रयत्न केला होता याबाबत खापरखेडा पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणारे हे आरोपी नागपूरवरून फरार होऊन नवी मुंबईच्या ऐरोली या ठिकाणी वास्तव्यास आल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार नागपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने  रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ त्यांच्याकडे माहिती दिली. रबाले पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दयानंद वनवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शना खाली तांत्रिक तपास केला

 गोपनीय बातमी दाराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त होताच  रबाले पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक दयानंद वनवे पोलीस हवालदार २३३० प्रसाद वायगणकर पोलीस नाईक ३४४७ कारंकाळ यांनी नागपूर पोलिसासह या तीन्ही आरोपींना   दिवागाव सर्कल इथून ताब्यात घेतले असल्याची माहिती रबाले पोलिसांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट