योगीराज श्री गगनगिरी महाराजांचे पुण्यतिथी उत्सवाचे खोपोली येथील आश्रमांत भव्य आयोजन!

खोपोली - प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वामी श्री गगनगिरी महाराज यांचे खोपोली (रायगड) येथील पाताळगंगा तीर्थक्षेत्री असलेल्या चैतन्यदायी समाधीस्थानी अर्थात योगाश्रम खोपोली येथील श्री गगनगिरी आश्रमांत महाराजांचा १६ व्या पुण्यतिथी उत्सवास दिनांक ६ फेब्रुवारीला प्रारंभ होणार आहे.

या निमित्ताने आश्रम स्थानी विविध धार्मिक,सामाजिक आरोग्य विषयक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  असून, त्याची जोरदार तयारी सुरू असून,संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी  सेवेकरी सतत कार्यरत आहेत.

मंगळवार,दि.६ फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता गुरुसप्तशती या ग्रंथाचे सामूहिक पारायण  होणार असून, या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पहाटे महाराजांच्या मूर्तीस मंगल स्नान तसेच पादुकांवर अभिषेक पूजन करण्यात येणार असून नंतर काकड आरती व इतर धार्मिक विधी संपन्न होतील. व भाविकांना  दर्शनास सोडण्यात येईल.नंतर सकाळी १० वाजेपासून महाप्रसाद वाटप सुरू होईल. 

सदर उत्सवाच्या निमित्ताने आश्रमस्थानी भजन-पूजन - नामस्मरण -कीर्तन-प्रवचन-होमहवन भंडारा व गगनगिरी रथ-यात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले आहे,तरी जास्तीत जास्त भाविकांनी या स्थानी येवून सक्रिय सहभाग घेऊन श्री स्वामी गगनगिरी महाराजांचे दर्शन-आशिर्वादाचा लाभ घ्यावेत व सक्रिय सहकार्य करावे,असे आवाहन आश्रमसंस्थाचे वतीने करण्यात आले आहे!

संबंधित पोस्ट