रबाले एमआयडीसीत उद्योजकांनी केले फुटपाथ काबीज !.. अतिक्रमण विभाग करते काय ? नागरिकांचा संतप्त सवाल !
नवी मुंबई -रबाले एमआयडीसी क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांनी उद्योजकांनी कंपन्याचे सामान मोठमोठ्या मशीन पत्रे अवजड वस्तू फुटपात व रस्त्यावर टाकून रस्ते व फुटतात काबीज केलेली आहे.
त्यामुळे ईतर कंपन्यांच्या वाहनांना व पादचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या कामगारांना हि मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते.अशा उद्योजकांनी वाढीव बांधकामासह फुटपात वरील जागाही काबीज किल्ल्याचे स्पष्ट चित्र निदर्शनास येत आहे आहे अशा मुजोर उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नसून हे उद्योजक स्वतःच्या स्वार्थासाठी अतिक्रमण करत आहेत.
त्याचबरोबर इमारत बांधकाम साहित्य टाकून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेली दिसून येते फुटपाथ वरील विटा रेती भुसा रेतीच्या गोण्या खडी दगड सिमेंट अशाप्रकारे विविध सामान टाकून फुटपाथ काबीज केलेला आहे.
याकडे अतिक्रमण विभागाला सुज्ञ नागरिकांनी वारंवार माहिती देऊन ही एमआयडीसी अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांनी जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते यामुळे कंपनीतील कामगारांना पादचाऱ्यांना व इतर वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून हे अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे फुटपाथ वरील अतिक्रमण त्वरित हटवावे अशी मागणी स्थानिक नागरिकाकडून जोर धरत आहे
रबाले एमआयडीसी भागात ज्या कंपन्यांनी अतिक्रमण करून फुटपाथ व रस्ते काबीज केलेली आहेत अशा उद्योजकावर कारवाई करण्यात येणार आहे पोलीस सुरक्षा व्यवस्थेसाठी मागणी केली आहे गणपती विसर्जन मुळे विलंब झाला काही दिवसातच पोलीस संरक्षण मिळाल्यावर या कंपन्यांना नोटीसा देऊन अशा कंपन्यावर कारवाई करण्यात येईल.
अशोक सावकार अतिक्रमण विभाग अधिकारी एमआयडीसी महापे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम