मुख्याध्यापक सुरत्न आरख यांची संभाजी ब्रिगेड शिक्षक विभागाच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड !..

नवी मुंबई - गेल्या २३ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे मुख्याध्यापक सुरत्न आराख यांची नवी मुंबई संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून शिक्षक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ही निवड संभाजी ब्रिगेड या पक्षाचे जिल्हाध्यक्ष मारुतीराव खुटवड यांनी केली असून मुख्याध्यापक आराख यांना या संदर्भातले नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चव्हाण, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश जयस्वाल, नवी मुंबई संभाजी ब्रिगेडचे  सचिव प्रदीप घार्गे, सचिन वाघ प्रकाश निकम, दादा साहेब लादे, संभाजी ब्रिगेड संघटनेचे सल्लागार सिद्धार्थ जाधव, सुनिता सपकाळ खन्ना मॅडम, नदीम पटेल, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

दरम्यान  मुख्याध्यापक आराख हॉली प्रॉकेट इंग्लिश हायस्कूल या विद्यालयात सन २००० पासून कार्यरत आहेत  ते मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांचे शिक्षण बीए बीएड बीपीईड पर्यंत झालेले आहे संभाजी ब्रिगेडच्या शिक्षक जिल्हाध्यक्ष  पदी निवड झाल्यानंतर प्राध्यापक आराख यांनी शिक्षक कर्मचाऱ्यावरती होणारे अन्याय  दूर करण्यासाठी प्रथमता प्राधान्य देईल  संभाजी ब्रिगेडच्या संघटनेत शिक्षक कार्यकर्ते मोठ्या  प्रमाणात कार्यरत राहतील अशी  ग्वाही त्यांनी नियुक्तीपत्र स्वीकारताना दिली.

संबंधित पोस्ट