राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या भारत बंदला घनसोलीतून प्रतिसाद !

नवी मुंबई - आदिवासी समाजाच्या न्याय हक्काच्या विरोधात केंद्रामधील नरेंद्र मोदी सरकार कडून आदिवासीं समाजाच्या  विरोधात संसद मध्ये गैरकानून विधायक मांडले जाणार आहे  या विधायकाला आदिवासी समाजाने तीव्र विरोध केला आहे  आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करण्याची रणनीती आखली जात आहे मणिपूर राज्यामध्ये महिलांवर झालेल्या सामूहिक अत्याचाराबाबत व इतर मुद्दे घेऊन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने भारत बंदची हाक दिली होती ज्या ज्या राज्यामध्ये आदिवासी समाजाची एकजूट व ताकद मोठ्या प्रमाणात आहे अशा राज्यात भारत बंद आंदोलनाला मोठ्या प्रमाणात  यश  मिळत आहे दरम्यान घणसोली नवी मुंबई येथे भारत मुक्ती मोर्चा नवी मुंबई  जिल्हा अध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारत बंदमध्ये सहभाग घेऊन जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते उत्तमराव रोकडे जयराम जाधव दलित पॅंथर चे सुनील गायकवाड बामसेफ चे संजय माळी बहुजन क्रांती मोर्चा नवी मुंबई अध्यक्ष राजू कांबळे, ऑल इंडिया पॅंथरचे दीपक वंजारी,ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन राहुल शेळके, बाळासाहेब भवरे,  शरद जाधव, बाळासाहेब मानकर, प्रेमानंद तायडे, विजय मोकल, पत्रकार राजू मीर, आंबेडकरवादी ज्येष्ठ नेते  संभाजी रोकडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित पोस्ट