मुंब्रा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत शिमला पार्क ते रेतीबंदर पर्यंत मोहरम (ताजिया) सणानिमित्त वाहतुकीत बदल

ठाणे -  मुंब्रा वाहतूक  उप विभागाच्या हद्दीत  दि. २९ जुलै २०२३ रोजी मोहरम(ताजिया)' सणानिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीच्या वेळी एक लाखाच्या आसपास  जनसमुदाय सहभागी होणार ही मिरवणूक शिमला पार्क येथून सुरु होवून रेतीबंदर पर्यंत जावून विसर्जन होणार आहे. मोठ्या प्रमाणात एकत्र आल्यास या मिरवणुकीच्या वेळी तसेच मिरवणुकीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता दि. २९ जुलै २०२३ रोजी दुपारी १ रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याचे ठाणे शहर वाहतूक विभाग, पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.  

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे

प्रवेश बंद :- १) कल्याण फाटा, शिळफाटा कडून मुंब्रा शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. २) कळवा,  खारेगाव कडून मुंब्रा शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना रेतीबंदर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग:- ही वाहने मुंब्रा बायपास  (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) मार्गे इच्छित स्थळी जातील.

तसेच ही अधिसूचना मोहरम (ताजिया) सणाच्या दिवशी म्हणजे दि. २९ जुलै २०२३ रोजी दुपारी १ रात्री १० अंमलात राहणार असून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असेही वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.  

                                                              

संबंधित पोस्ट