
कोकण पदवीधर मतदार संघात ठाणे ग्रामीण मधून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणार - दयानंद चोरघे
- by Mahesh dhanke
- Jul 19, 2023
- 397 views
शहापूर - कोकण पदवीधर मतदार संघाची पुढील वर्षात निवडणूक होणार असून या मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यासाठी ठाणे ग्रामीण काँग्रेस सज्ज असून यासाठी स्वतंत्रपणे टीम कार्यरत करणार असल्याचे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी स्पष्ट केले आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रदेश स्तरावर नुकताच प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक घेण्यात आली यावेळी ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष महेश धानके,महिला जिल्हा अध्यक्ष जान्हवी देशमुख उपस्थित होते यावेळी जिल्हा अध्यक्ष म्हणून बोलताना दयानंद चोरघे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसने ताकदीने लढवावा अशी सूचना करून या मतदारसंघात काँग्रेस विजयी होईल यासाठी ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून आम्ही मतदार नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणार असल्याचे चोरघे यांनी सांगितले. राज्यात जे राजकीय पळवापळवीचे राजकारण सुरू आहे त्याला जनता कंटाळली असून राज्यातील जनता पुन्हा काँग्रेसकडे आकर्षित झाली आहे.कोकण पदवीधर मतदार संघात काँग्रेस जिंकल्यास कोकण विभागातील इतर निवडणूक जिंकणे काँग्रेसला सोपे होणार आहे.आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी सज्ज असल्याचे दयानंद चोरघे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम