समता मानव सेवा संस्थेच्या वतीने छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती साजरी

ठाणे - समता मानव सेवा संस्थेच्या विद्यमाने समता पुरुष लोकराजा राजर्षी शाहुजी महाराज यांचा जयंती महोत्सव महाराष्ट्रातील विचारवंत प्रतीथयश कवींच्या उपस्थितीत संपन्न झाला, हा जयंती उत्सव वर्तकनगर भीमनगर येथील संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला, सोमवार दिनांक २६ जून रोजी सायंकाळी अतीउत्साहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता मानव सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओबीसीं नेते शिवश्री धनाजी सुरोसे होते, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकारआबासाहेब चासकर यांनी राजर्षि शाहुजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली समाजहिताशी निकट असे शाहु राजांचे कार्य पैलू उलगडून सांगीतले, राजर्षी शाहू राजे यांच्या आदर्शवादी व गौरवशाली उज्वल प्रसंगातील काही क्षणचित्रे उपस्थितांच्या समोर मांडले, याप्रसंगी कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत ज्येष्ठ कवी के पुरुषोत्तम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनातून बोलताना शाहु राजांच्या शाही स्नान प्रसंगी ब्राह्मण पुरोहितांने पुराणोक्त मंत्र उच्चारुन शुद्र म्हणून अवहेलना केल्याचे उदाहरण सांगून त्यां प्रसंगावर कवी गीतकार भास्कर केदारे यांनी काव्य रचना सादर केली,

शाहिर बाळासाहेब जोंधळे यांनी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला, कवी अनिल गायकवाड यांनी त्यांच्या काव्यातून शाहु महाराजांनी मानगांव येथील बहिष्कृत  परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील बहुजन उद्धारासाठी देशाचं नेतृत्व करतील अशी दूरदृष्टी ठेवून भर सभेत जाहीर केले होते ते आज खरे ठरल्याचे दिसून येत आहे हे फक्त शाहू महाराज हेच त्यावेळी ओळखू शकले असा गौरवपूर्ण उल्लेख केला,

शाहिर वसंत हिरे देवरगांवकर यांनी देखील आपल्या शाहिरीतून दयाळू कनवाळू राजा शाहुजी महाराज यांचा पहिले मागासवर्गीय आरक्षणाचे जनक म्हणून गौरवपूर्ण पोवाडा गायला, ज्येष्ठ साहित्यिक आणि राजलक्ष्मी चे संपादक कवी राजा रावळ यांनी त्यांच्या काव्यातून शाहु महाराजांनी भटके विमुक्त जमातींच्या लोकांना शिकारीच्या निमित्ताने हाकारे आणि ढोल वाजवायला वाजे म्हणून नेमणूका दिल्या आहेत, हा ऐतिहासिक ठेवा असल्याचे सांगीतले, शेवटी व्ही जी सकपाळ गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले

अध्यक्षिय भाषणात धनाजी सुरोसे यांनी संकल्प जाहीर केला की, छत्रपती शाहु महाराजांची जयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल त्यात महाराजांच्या कार्यकाळात समाजहिताच्या कामाला प्राधान्य दिले होते, मनुवादी विचारांना सुरुंग लावून आपले राज्य पणाला लावले,हे कृतीतून तळागाळातील जनतेपर्यंत आपल्या बहुजन उद्धाराचे कार्य त्या विषयावर प्रदर्शनाद्वारे पोहोचवले जाईल असे आश्वासन दिले,

यावेळी दै महाराष्ट्र वृत्तांतचे पत्रकार भिमराव शिरसाट, समाजसेवक उत्तम शिनगारे, पत्रकार भुजंगराव सोनकांबळे, विजय सावळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट