" सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अभद्रभाषेचा प्रयोग करू नये ” डॉ विनायक सहस्त्रबुद्धे यांचे आव्हान

नवी मुंबई -  मोदी@9 विशेष जनसंपर्क अभियान च्या अंतर्गत ठाणे लोकसभा चे सोशल मीडिया संयोजक व प्रदेश आयटी सेल चे संयोजक  सतीश निकम, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष  सुयज पत्की आणि  अलोक ओक यांनी सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर्स मीट चे आयोजन केले. समाज मानवता आणि संस्कृतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी इन्फ्ल्युएन्सर्स सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर कसा करू शकतात यावर या कार्यक्रमाद्वारे चर्चा करण्यात आली. राजकारण, अर्थशास्त्र आणि मनोरंजन यासह विविध प्रकारच्या कॉन्टेन्टवर काम करणारे इन्फ्ल्युएन्सर्स या कार्यक्रमात उपस्थित होते.

या विषयावर संबोधन करण्यासाठी माजी राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार  गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, प्रवक्ते प्रेम शुक्लाजी तसेच सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रकाश गाडे यांनी केले. कार्यक्रमात विशेष उपस्थित आमदार निरंजन डावखरे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, चेतन पाटील, मनोहर डुंबरे, विलास साठे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट