"सिडको" प्रशासन होश में आव ! हा नारा देत बौद्ध बांधवांच सिडको विरोधात हल्लाबोल !
घनसोलीत बौद्ध बांधवांच्या धार्मिक स्थळासाठी जागा द्या!
नवी मुंबई - सिडको प्रशासन होश में आव! होश में आव ! हा नारा देत बौद्ध बांधवांनी मंगळवारी सिडको प्रशासनावर हल्लाबोल करत मोठ्या संख्येने मोर्चा चे आयोजन करत निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षापासून घनसोली विभागातील सेक्टर ४ येथे बुद्धघोष विहार बौद्ध बांधवांनी आपल्या धार्मिक प्रार्थनेसाठी बांधलेले आहे या बुद्ध विहाराची जागा सिडको प्रशासनाने मनमानी करत इतरत्र सोसायटीला देऊन घनसोली येथील बौद्ध बांधवांचे खच्चीकरण करण्याचा डाव साधत बौद्ध बांधवांना अपमान स्पदाची वागणूक दिलेली आहे सन २००७ ते २००८ पासून या नियोजित जागेवर बौद्ध बांधवांचे बुद्ध विहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्था (रजी) यांच्यामार्फत सन २०१० पासून सिडको प्रशासनाला पत्र व्यवहार करून बौद्धांच्या धार्मिक स्थळासाठी कायमस्वरूपी आणि अधिकृत जागेचे नियोजिन करा व सिडकोच्या नियमाप्रमाणे जी काही रक्कम असेल ती घ्या अशा प्रकारची सातत्याने मागणी करून देखील सिडको प्रशासनाने २०१४ च्या दरम्यान सदरची नियोजित जागा समर्थ को-ऑपरेटिंग सोसायटी माथाडी कामगार या संघटनेला देऊन अक्कलेचे तारे तोडून बौद्ध बांधवांच्या धार्मिक भावना दुखवत जखमेवर मीठ चोळण्याचे कारस्थान केले असल्याचा आरोप मोर्चेकरी धम्म बांधवांनी व्यक्त केला आहे
या विरोधात नवी मुंबईतील समस्त बौद्ध बांधवांनी गट तट विसरून एकत्र येऊन वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर आपला आक्रोश निर्माण करीत सिडको प्रशासनाचा निषेध केला आहे या मोर्चाचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रमेश बनसोडे, बुद्ध विहार बचाव कृती समितिचे सचिव सचिन कटारे तर सूत्रसंचालन पत्रकार सुनील गायकवाड यांनी केले.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे, टिळक जाधव, विजय कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष नामदेव भगत, शिवसेना कामगार आघाडीचे नेते प्रदीप वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे प्रकाश वानखेडे, रेखाताई इंगळे, शिवसेनेचे गौतम बलवंते, सूर्यकांत मढवी, भीम आर्मी या संघटनेचे पाईकराव, वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष भूषण कासारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे गटाचे) पि टी जाधव, भारतीय बौद्ध महासभा चंद्रकांत माने, भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई उपाध्यक्ष संकेत डोके, बहुजन समाज पार्टीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश जयस्वाल,धम्म दूत संघटनेचे पांडुरंग सोनवणे, ऑल इंडिया ॲक्शन बुद्धिस्ट पर्सनल लॉ या संघटनेचे प्राध्यापक माणिकराम डेकाडे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष रमेश बनसोडे, प्राची प्रकाश जाधव, नंदाताई कांबळे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिल्पाताई रणदिवे, गजानन जाधव, उत्तमराव रोकडे,बामसेफ संघटनेचे संजय माळी, आर डी रोकडे, संभाजीराव रोकडे. पत्रकार आनंदराज गायकवाड इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
दरम्यान घनसोली विभागात बौद्ध बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या रास्त मागणीचा सिडको प्रशासनाने विचार करून त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे अशा भावना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष दशरथ भाई चव्हाण यांनी व्यक्त केली बौद्ध बांधवांच्या आंदोलनाला सकारात्मक पाठिंबाही जाहीर केला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम