चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला लोक हिंद गौरव पुरस्कार सोहळा

शहापूर - जेष्ठ साहित्यिक,बहुजन विचारवंत जनक्रांती नायक डॉ दिलीप धानके यांच्या स्मृतिनिमित्ताने लोक हिंद वृत्तवाहिनी व साप्ताहिक शिवमार्ग तर्फे आयोजित करण्यात आलेला लोक हिंद गौरव पुरस्कार सोहळा चित्रपट निर्माते उद्योगपती नरेंद्र जिचकार आणि जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक पार्श्वगायक विराग वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रेक्षकांच्या प्रंचड उत्साहात साई भगवान लॉन्स,शहापूर येथे संपन्न झाला.

ठाणे,पालघर,रायगड,बीड,बुलढाणा,नागपूर  पुणे,मुंबई आदी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 38 मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार दौलत दरोडा, ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, ठाणे पालघर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अरुण पानसरे,सौ.वंदना वानखडे,सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाचे अध्यक्ष किशोर कुडव,शिवसेना संपर्क प्रमुख आकाश सावंत,राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा विद्या वेखंडे, काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्षा जान्हवी देशमुख, शिवसेना महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे,अपर्णा खाडे,प्रकाश भांगरथ, डॉ तरुलता धानके,बाजार समिती संचालक,वामन गायकर,जगन धानके,जगदीश पवार,नकुल निमसे,विठ्ठल भगत,अनिल निचिते,विलास शेलार,सुनील धानके,काशिनाथ तिवरे,प्रकाश भांगरथ,मनोज विशे,वसंत पानसरे,नितीन घरत,मनोज आंबेकर,बाळासाहेब शिंगणे,योगेश हजारे,मिलिंद करन ,संध्या पाटेकर,रंजिता दुपारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक महेश धानके यानी केले.चित्रपट निर्माते,नरेंद्र जिचकार व दिग्दर्शक विराग वानखडे यांनी कार्यक्रमाचे व महेश धानके यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच डॉ.दिलीप  धानके यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून यावर्षी पुरस्कार यादीत प्रसिद्ध कीर्तनकार सोनाली कर्पे, नगरसेविका डॉ कामिनी दिनकर,स्व.दिलीप आकरे पाटील,कु.संस्कृती म्हात्रे,विनायक सापळे,शरद वेखंडे, नवनाथ पवार,जि प शाळा नारायणगाव,अनंत भारसाकले, पाठीराखा प्रतिष्ठाण,विजय फाळके आदींचा समावेश होता.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरस्कार निवड समिती अध्यक्ष किसन बोन्द्रे,कार्याध्यक्ष परशुराम पितांबरे,लक्ष्मण घरत,भास्कर जाधव, रामचंद्र जोशी,अंकुश भोईर,रवी जाधव,अरविंद निपुर्ते, हमीद शेख,धनाजी धसाडे,महेंद्र आरज,पंढरीनाथ पांढरे,जयदीप देशमुख,जयवंत विशे,यश धानके,सिद्धार्थ धानके,मुकेश विशे,धनश्री पाठारी,संतोष ठाकरे,शरद रातांबे,सतीश घरत,कांतीलाल वरकुटे,सुनील महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट