बुद्धाचा विचार अंगीकारल्यास मानव जातीचे दुःख नष्ट होण्यास वेळ लागणार नाही-भदंत विमल कीर्ती गुणसिरी
नवी मुंबई -तथागत गौतम बुद्धाने ज्या गोष्टी स्वतः अनुभवल्या त्याच गोष्टी त्यांनी इतरांना पटवून दिल्या आहेत अनुभवातून त्यांना जे सिद्ध झाले त्याच गोष्टींचा प्रचार आणि प्रसार बुद्धाने केलेला आहे मानव जातीचे खरोखरच दुःख दूर करायचे असल्यास प्रत्येक मानवाने बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण केले पाहिजे तरच त्याच्या दुःखाचे निवारण झाल्याशिवाय राहणार नाही असे मत घनसोली परिसरातील बौद्ध बांधवांनी आयोजित केलेल्या बुद्ध जयंती निमित्ताने धम्मदेसना या कार्यक्रमा दरम्यान जागतिक कीर्तीचे भदंत विमल कीर्ती गुणसिरी यांनी बोलताना व्यक्त केले
घनसोली मध्ये प्रथमच बुद्ध जयंती कृती समिती च्या वतीने तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमा दरम्यान तथागतांच्या व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला धम्मदूत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग सोनवणे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान: या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे घनसोली शहराचे नेते गजानन जाधव, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव रोकडे, मुंबईचे माजी सेवानिवृत्त फौजदार डी जे सूर्यवंशी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राहुल बोराडे उद्योजक विश्वासराव डोंगरदिवे, अनिल पतारे, धम्मपाल इंगोले, संजय माळी, दत्ता गायकवाड, अविनाश कोरडे, सुभाष लबडे, पत्रकार सुनील गायकवाड, पत्रकार राजू मीर, प्रफुल हंबर्डे, जयवंत भगवान बाबा गुरव, संगीताताई धुमाळ, चैतन्य गायकवाड, अशोक पगारे, संभाजीराव रोकडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड, दीपक दादा अडसूळ, व घणसोली विभागातील महिला मंडळासह इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम