
वरिष्ठ राहतात बाजूला बळी जातो कर्मचाऱ्याचा कोपरखैरणे कार्यालयात टंक लेखक लिपिकाला अटक!
नवी मुंबई - नवी मुंबई महानगर पालिके मध्ये एका कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यासाठी कोपरखैरणे कार्यालयातील लोकसेवक कर्मचाऱ्याने पाच लाखाची लाच मागितल्याच्या आरोपाखाली त्याला लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केलेली आहे.
या प्रकरणी कोपर खैरणे प्रभाग कार्यालयात एकच खळबळ उडालेली आहे पूर्वी नेरूळ येथे कार्यरत असलेल्या व सध्या नवी मुंबई मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या एका नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बदली पूर्ववत करण्यासाठी ५ लाखाची मागणी केली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे मात्र ही मागणी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार या टंकलिपिकाने केली याबाबत गोपनीय चौकशी केली पाहिजे ! व फिर्यादी कर्मचाऱ्याला इतरत्र झालेली बदली का मान्य नाही ?त्याला पूर्वीच्याच पदावरती किंवा त्याच ठिकाणी जाण्याचा मोह का होता ? पूर्वीच्या टेबलावरती कोणती काळी जादू कोणती काळी माया जमा होत होती का ?
याबाबत फिर्यादी असणाऱ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांची किंवा अधिकार्याची देखील खातीनिहय चौकशी झाली पाहिजे! अशी मागणी करदात्या जनतेकडून होत आहे
एखाद्या कर्मचाऱ्यांची बदली साधा टंकलेखक लिपिक करू शकतो का? अथवा एवढ्या मोठ्या रक्कमेची मागणी लिपिक पदावर असणारा कर्मचारी करणार आहे का ? हा खरा प्रश्न गुलदस्त्यात आहे मग सदर रक्कम कुणाच्या सांगण्यावरून त्या टंकलेखक लिपिकाकडून कोणाला द्यायचे ठरले होते आणि सदरचा गोपनीय शेरा लवकरात लवकर पाठवण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याला आहे याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे अन्यथा वरिष्ठांच्या आदेशाला बळी पडून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा बकऱ्याप्रमाणे बळी देण्याचे कारस्थान संपणार नाही ! याबाबत देखील लाच लुचपत अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी करून खरंच ही रक्कम कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यासाठी किंवा त्याच्या सांगण्यावरून घेतली ? अशाप्रकारे चौकशी केल्यास त्यात संबंधित अधिकारी दोषी असल्यास "दूध " का दूध ! और पानी का पानी होईल !
त्या त्यानुसार त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला देखील तात्काळ जेरबंद केले पाहिजे व त्याच्या आर्थिक मालमत्तेची देखील चौकशी झाली पाहिजे नाहीतर एखादा कनिष्ठ पदावरील कार्यरत असलेला कर्मचारी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चोचले पुरवण्यासाठी ईद च्या बकऱ्याप्रमाणे बळी जाण्यासाठी प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयार केल्याचा सूर सर्वसामान्य सुज्ञ जनतेकडून ऐकायला मिळाल्याशिवाय राहणार नाही
दरम्यान: लाच लुचपत पथकाने कोपरखैरणे महानगर प्रभाग समिती मधील टंकलेखक दिनेश सोनवणे नामक लोकसेवकाला ५ लाख रुपये लाच घेतल्याच्या आरोपावरून शुक्रवारी ताब्यात घेतलेले आहे दिनेश सोनवणे हा साधा लिपिक असून त्याच्या सहीने कोणत्याच कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर वार्षिक गोपनीय शेरे पाठविले जाणार नाहीत त्यामुळे दिनेश सोनवणे यांनी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून सदर रक्कमेची मागणी केली याची चौकशी लाचलुचपत विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम