दत्तात्रय धर्माधिकारी यांना देण्यात आलेला पुरस्कार निरपराध लोकांच्या मृत्यूच्या किंकाळ्यांनी भरला असून तो पुरस्कार सरकारने परत घ्यावा.मा.मिलिंदजी बेळमकर यांची मागणी.

ठाणे -सध्याच्या राज्यकर्त्यांची अवस्था ही कळतं पण वळत नाही अशी झाली असून याला कारण सत्तेची झापड आहे.सत्ताधारी पक्षांकडून राजकीय स्वार्थासाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी नेहमीच जनतेच्या पैश्याची उधळपट्टी होते.अशी घणाघाती टीका रिपब्लिकन नेते मा.मिलिंदजी बेळमकर यांनी केली असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराला दिली आहे.

मा.मिलिंदजी बेळमकर पुढे म्हणाले की , काल परवा आमच्या कोकण पट्ट्यात असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खारघर पनवेल  येथे सूर्य आग ओकत असताना भर उन्हात आयु.दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हजारो भक्तांच्या समोर  देण्यात आला. ह्या आग ओकणाऱ्या उन्हाचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांनी स्वतः  व भारताचे गृहमंत्री आयु.अमितभाई शहा यांनी आपल्या भाषणात वारंवार केला , तरी भक्तांना मात्र नेहमीप्रमाणेच याहीवेळी  शहाणपण सुचलं नाही, वास्तविक त्यांना सगळं काही कळत होतं पण वळत नव्हतं.( आयोजकांच्या चुकामुळे) आयोजकांनी भक्तांना पेंडॉलची ( मंडपची ) व्यवस्था का केली नाही?  जो कार्यक्रम आत्तापर्यंत बंदिस्त जागेत मोजक्याच राजकीय, सामाजिक प्रतिष्ठित नागरिकांसमोर दिला गेलाय.आता सुध्दा त्याच प्रकारे दिला असता तर तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार लहान झाला असता का? किंवा तो पुरस्कार घेणारा व्यक्ती लहान झाला असता काय ? नक्कीच लहान झाला नसता पण या सरकारला आपली राजकीय पोळी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजून घ्यायची होती. कोकणी मतावर डोळा ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , हे एक लहान शाळकरी शेंबडे पोरगं सुध्दा सांगू शकेल.जो प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी असाच प्रकार होता.हा सगळा प्रकार कुणामुळे घडला , याला दोषी कोण ? हे आता शोधत बसण्यापेक्षा यापुढील कार्यक्रमांचे चांगल्या प्रकारे नियोजन करावे हीच माफक व रास्त अपेक्षा.कसल्याही प्रकारचे ढिसाळ नियोजन केले किंवा चांगले नियोजन केले तरी पैसा तुमचा थोडीच जाणार आहे, तर महाराष्ट्र राज्यातील सामान्य कष्टकरी मराठी माणसाच्या नावावर टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेला फुकटचा पैसाच तर तुम्हाला उडवायचा आहे. मग एका २५ लाखाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुम्ही १४ करोड ₹ खर्च करा किंवा २५ करोड ₹ खर्च करा , तुम्हाला विचारणार कोण? पण निसर्ग व नियती ही कुणालाच माफ करत नाही.याच निसर्ग व नियतीने काही जणांच्या प्राणाची आहुती घेवून तुमचे पितळ उघडे पाडले आणि तुमचा कोकणी माणसाला भुलवण्याचा डाव बुमऱ्यांग झाला. एकीकडे एका माणसाच्या पुरस्कारासाठी / सन्मानासाठी सुमारे  १४ करोड रुपये आमचे सरकार खर्च करते , तर दुसरीकडे मात्र हेच सरकार , जे ह्या ढिसाळ नियोजनाचे व व्यवस्थेचे बळी पडलेत त्यांना प्रत्येकी फक्त ५ लाख मदत देत आहे , म्हणजे अंदाजे १ करोड सुध्दा नाही. ४० जणांना ५० खोके ( असे मी नाहीतर विरोधीपक्ष नेते व सर्वसामान्य जनता बोलत आहे.) आणि १५ ते २० जणांना आपल्या प्राणाची किंमत फक्तं ५ लाख रु ? व्वा रे व्वा सामान्य जनतेचे सरकार.पण इतिहासात डोकावून पाहिले तर याची प्रचिती मिळते, एकवेळ मानव जातीला विसर पडेल, पण नियतीला ज्या गोष्टी पटत नाही ,  नियती त्याला कधीच माफ करत नाही.असेही बेळमकर यांनी म्हणल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट