मांजरे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे हात जोडो अभियान

शहापूर -ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार आज  शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी मांजरे जिल्हा गटातील डोहळेपाडा, पांढरीचा पाडा,मांजरे,बेलवली,साखरपाडा,ढाढरे,ढाढरेवाडी,डोंगरवाडी,उंबरवाडी,फ़णसवाडी या भागात  शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हात से हात जोडो अभियान राबविण्यात आले.

या अभियानात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा माजी उपसभापती महेश धानके, महिला जिल्हा अध्यक्षा जान्हवी देशमुख पर्यावरण जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जोशी, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दत्ता बरोरा, महिला तालुका अध्यक्षा संध्याताई पाटेकर,पर्यावरण तालुका अध्यक्ष महेंद्र आरज आदिवासी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मुकणे,जयदीप देशमुख जयवंत पाटेकर,यशवंत विशे,सुप्रिया झुंजारराव,ज्योती परदेशी,रामदास भोईर वाळकू पोकळा, सिकंदर शेख,आंबो खंडवी, कान्हू खडके,भगवान उघडा,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हात से हात जोडो अभियानात राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेतील संदेश असणारी पत्रके वाटण्यात आली. महिला जिल्हा अध्यक्ष जान्हवी देशमुख यांनी वाढत्या महागाईने हैराण झालेल्या महिलांशी संवाद साधला व काँग्रेस पक्षाची भूमिका आणि हात जोडो अभियानाचा उद्देश महिलांना सांगितला.

शहापूर तालुका काँग्रेस तर्फे मागील दोन महिन्यांपासून हात जोडो अभियान सुरू असून शहापूर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त बुथवर अभियान राबविणार असल्याचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट