केजरीवालांच्या जनता दरबारात जिवंत काडतूस; एकाला अटक


दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारातून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या संशयिताकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इमरान (३८) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आयोजित जनता दरबार कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मोहम्मद इमरान आला होता. त्यावेळी तपासणीदरम्यान त्याच्या खिशात पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडले. त्यानंतर त्याला पोलिसांनी लगेच आपल्या ताब्यात घेतले.

मोहम्मद इमरान हा सीलमपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या सोबत १२ अन्य इमाम आणि मौलवी हे देखील होते. हे सर्व दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी अशी शिफारस करण्यासाठी जनता दरबारात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मोहम्मद इमरान यांच्याकडे जिवंत काडतूस सापडल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. याआधी गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पूड फेकल्याची घटना घडली होती. 
 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट