शहापूरमध्ये काँग्रेस तर्फे म गांधी पुण्यतिथी व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

शहापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन शहापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे  करण्यात आले होते.

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यालयाच्या बाहेर सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रकाश भांगरथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शहापूर तालुक्यात हात से हात जोडो  अभियानाचे नियोजन बाबत चर्चा करण्यात आली. प्रकाश भांगरथ व महेश धानके यांनी महात्मा गांधी व त्यांची विचारधारा यावर आपले मनोगत व्यक्त केले.

सदर प्रसंगी प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले प्रदेश ओबीसी सचिव जितेश विशे,महिला तालुका अध्यक्षा संध्या पाटेकर युवक अध्यक्ष अंकुश भोईर,सेवादल तालुका अध्यक्ष दशरथ भोईर,लक्ष्मण घरत,श्रीपत संगारे,रामचंद्र जोशी, बुदाजी मांजे, पद्माकर वरकुटे, काळूराम भोईर,राम वाघ,सुप्रिया झुंजारराव, मल्हारी,कोळेकर,संतोष पांढरे,दिलीप पंडित दशरथ तारमळे, भक्ती पाटील,धनश्री पाठारी, अब्दुल शेख,मुकुंद वेखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट