
काँग्रेस तर्फे वासिंद पूर्व येथे हात से हात जोडो अभियान
- by Mahesh dhanke
- Jan 24, 2023
- 283 views
शहापूर : भारत जोडो यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसने हात से हात जोडो अभियान सुरू केले असून आज या अभियानाचा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली वासिंद पूर्व येथून शुभारंभ करण्यात आला.
हात से हात जोडो अभियान शहापूर तालुक्यात दोन महिने चालणार असून आज खंडोबा देवस्थान मोरदेव नगर वासिंद येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विरेन चोरघे व सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रकाश भांगरथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभियानाला सुरुवात झाली मोरदेवनगर ते वासिंद पूर्व रेल्वे स्टेशन पर्यत पदयात्रा करून पत्रके वाटप करून चौकसभा घेऊन अभियानाचा समारोप करण्यात आला.देशात निर्माण झालेले नफरतीचे वातावरण संपविण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी झाली असून सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या काँग्रेसचा व राहुल गांधी यांचा संदेश घेऊन आम्ही घरोघरी जाणार असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले तालुका निरीक्षक परशुराम पितांबरे,सूर्यकांत भोईर,महिला जिल्हा अध्यक्षा जान्हवी देशमुख,कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे,रामचंद्र जोशी,जितेश विशे,दत्ता बरोरा,असिफ शेख,शिवराम मोगरे,श्रीपत संगारे,संतोष ठाकरे,अंकुश भोईर,महेंद्र आरज, संतोष मुकणे,जयवंत पाटेकर,राम वाघ,सुनील शिर्के,बुधाजी मांजे,वसंत तारमळे,दिलीप पंडित,कल्पना तारमले सुवर्णा भोये,गुरुनाथ पाटील,ज्योती परदेशी शांताराम धामने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष संदीप पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वासिंद येथील सौ भक्ती पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम