भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची मुजोरी; सुरक्षा रक्षकास मारहाण
- by Adarsh Maharashtra
- Nov 25, 2018
- 1162 views
भाईंदर: भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी एका क्षुल्लक कारणामुळे भाईंदर येथील 'चाय सुटा बाजार' या दुकानात काम कारणा-या सुरक्षारक्षकास मारहाण केली. मारुती हनुमान हरिजन असे त्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून गेली पाच महिन्या पासून दुकानासमोरील ट्राफिक सांभाळण्याचे काम करत आहे. श्री सवामी समर्थ सिक्युरिटी एजेन्सी तर्फे त्याला नियुक्त केले होते.
दि. १९/११/१८ रोजी नरेंद्र मेहता दुकान समोर आले. त्यांची गाडी रस्त्यामध्ये उभी होती. त्यामुळे ट्राफिक व्हायला लागली, सुरक्षारक्षक हरिजन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मेहता यांना गाडी थोडी बाजूला उभी करण्याची विनंती केली. परंतु एक सुरक्षारक्षक गाडी बाजूला घ्यायला सांगतो याचा मेहता यांना राग आला. आणि सुरक्षारक्षकास मारहाण करण्यास सुरवात केली.
ही मारहाण हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये आली आहे. परंतु मेहता यांच्या दहशतीमुळे दुकान मालक सीसीटिव्हीचे फुटेज देण्यास नकार देत आहे असा दावा मारुती हरिजन यांनी केला आहे.
मारुती हरिजन यांने भाईंदर पोलिसात लेखी तक्रार नोंदवली आहे. परंतु पोलिसांनी याबाबत कोणतेही कारवाही अद्याप केली नाही.
संबंधित पोस्ट
Support US
विश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
Support US
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम