राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

कोल्हापूर : साखर कारखान्यातील भ्रष्टाचारा संदर्भातील एका प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीचे छापे टाकण्यात येत आहेत.असे ANI एजन्सीने म्हटले आहे.

मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीचे जवळ-पास २० अधिकारी आज सकाळी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले.

सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते.

संबंधित पोस्ट