गुलाबी थंडीत दाट धुक्याची चादर राजधानी सातारा

सातारा(अनील करंदकर) : देशातील राजधानी अर्थात दिल्ली सध्या चार अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाने कडाक्याच्या थंडीचा मौसम अनुभवत असताना गेले आठवडाभर गायब झालेली थंडी पुन्हा एकदा पडू लागली आहे. . सातारा शहरात गुरुवारी आज सकाळी गुलाबी थंडी बरोबरच दाट धुक्या चा नजाराही सातारकरांना अनुभवायला मिळाला. अगदी सकाळी दहा वाजेपर्यंत उन्ह वर आली तरी संपूर्ण शहर परिसरामध्ये दाट धुक्याची दुलई पांघरूण सातारा शहर गुडूप झालेले दिसत होते. शहरातील मोती चौक, राजपथ, चार भिंती तसेच पवई नाका परिसरातील सेल्फी फोटो पॉईंट तसेच विसावा नाका पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल या परिसरात ही दाट धुक्या ची चादर अधिक गडद दिसून येत होती.या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना अक्षरशः दिवसाही वाहनांचे दिवे लावूनच पुढे ये- जा करावी लागत होती. थंडीचा कडाका वाढत जाणार असला तरी साधारणपणे संक्रांतीनंतर ही थंडी कमी होऊ लागते असा समज आहे. संक्रांत सण साजरा झाल्यावर तीळ तीळ प्रमाणात ही थंडी कमी होऊन रथसप्तमीला या थंडीचा शेवट होतो आणि त्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागतात असा समज सर्वत्र आहे. मात्र सध्या गुलाबी थंडीचा नजारा सातारकर अनुभवत असतानाच हा दाट धुक्याचा गुडूप होणारा प्रकार अनुभवायला आता सातारकरांना विशेष आनंद मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे शहरातील प्रमुख चौका चौकात मऊ ब्लांकेट, स्वेटर, कान टोप्या विक्रेत्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. थंडीमध्ये अनेक व्यवहार ठप्प होत असल्याने आधीच छोटा दिवस असताना सायंकाळ नंतर रस्त्यांवरही लवकर जाणवत असतो.

संबंधित पोस्ट