सातारा जिल्ह्यामध्ये १७८ गावात बीएसएनएल फोरजी सेवा देणार
- by Reporter
- Jan 05, 2023
- 244 views
सातारा ( प्रतिनिधी ) : भारत संचार निगम लिमिटेडच्यावतीने सातारा जिल्ह्यामध्ये फोरजी आणि फाईव्हजी सेवा सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्यामध्ये सातारा जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये फोर जी सेवा सुरू करण्यात येणार आहे, त्यानंतर पुढील सहा महिन्यात फाईव्ह जी सेवा लाँच करण्यात येणार असून हे तंत्रज्ञान टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसद्वारे पुरवले जाणार आहे, अशी माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे सातारा वरिष्ठ महाप्रबंधक राजेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक प्रबंधक विपणन रियाज पटवेकर उपस्थित होते.राजेश कुमार म्हणाले, जिल्ह्यातील १७८ गावांमध्ये फोरजी सेवा सुरू केली जाणार असून त्यासाठी जिल्ह्यात दोनशे स्वेअर मीटर जागेमध्ये ६९ ठिकाणी टॉवर उभे करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच फोरजी सॅच्युरायझेशन उपक्रम देशभरातील २४६८० कोणतेही नेटवर्क नसलेल्या गावांसाठी मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यातील १७८ गावांसाठी आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संपूर्णपणे भारतीय बनावटीचे फोरजी मनोरे उभे केले जाणार आहेत. जाणार आहे." महाराष्ट्रामध्ये २४०६ गावांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी ४० मीटर जागा फोरजी टॉवर बनवण्यासाठी व दोनशे चौरस मीटर जागा प्रति मनोरा तसेच त्यासाठी लागणारी वीज जोडणी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.भूमिगत केबल टाकण्यास विनाशुल्क परवानगी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नेटवर्क विरहित गावांमध्ये डिजिटल इंडिया संकल्पनेस पाठबळ मिळणार आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास महाराष्ट्र सरकारने सूचना दिल्या आहेत. भारत संचार निगम लिमिटेड साताराने महसूल खात्याला १५ गावांमध्ये जागांसाठी विनंती पत्र दिले असून उर्वरित गावांसाठी भारत संचार निगम लिमिटेड जागेची पूर्तता भाडेतत्त्वावर करणार आहे, तसेच दुसऱ्या योजनेअंतर्गत भारत ब्रॉडबैंड नेटवर्क मदतीने सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्यमी योजनेअंतर्गत हाय स्पीड फायबर इंटरनेट सेवा सुरू केली आहे, ही सेवा ३९९ रुपये शुल्क ३० एमबीपीएस स्पीड संपूर्ण महिनाभर पुरवले जाणार आहे .
या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नील डिजिटल इंडिया या आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत भारत संचार निगम लिमिटेड ही जबाबदारी पार पाडणार आहे सातारा जिल्ह्यात बीटीएसचे ५७८ ग्राहक असून मोबाईल कस्टमर ९०००० आहेत. याकरता सातारा जिल्ह्यात बीएसएनएलला आतापर्यंत ३६० टॉवर उभारले असून फायबर ऑप्टिकल ब्रॉडबँडचे ७८०० ग्राहक मिळवण्यात बीएसएनएलला यश आले आहे, अशी माहिती सहाय्यप्रबंधक रियाज पटवेकर यांनी दिली..
रिपोर्टर