भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा प्लॉप भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपला लागली ओहोठी

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर,मुरबाड,भिवंडी तालुक्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यात कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपला ओहोटी लागल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केले आहे.


भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा काल शहापूर,मुरबाड, भिवंडी तालुक्यात दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्याचा भाजपने मोठा गाजावाजा करून खर्च करून दौरा यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती त्यामुळे या दौऱ्यात हजारो कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होतील असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात तिन्ही तालुक्यात केवळ शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याने लोकांनी भाजपाला नाकारल्याचे दिसून आले आहे.भाजप व मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना लोकांनी पाठ फिरवली याचा अर्थ भाजपचे काम लोकांना पसंत पडले नसून भाजपकडून लोकांचा अपेक्षाभंग झाल्यानेच भाजपला ओहोटी लागल्याचे चित्र असून लोकांचा कल पुन्हा काँग्रेसकडे आल्याचे चित्र दिसत आहे.देशात व राज्यात सत्तेवर असूनही भाजपच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा प्लॉप झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था,लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल असा विश्वास दयानंद चोरघे यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट