
वाईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल
- by Reporter
- Jan 04, 2023
- 314 views
सातारा(अनिल करंदकर): अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर २०२१ ते १२ डिसेंबर २०२२ अखेर अत्याचार केल्याप्रकरणी समीर सलीम पटेल वय २६ रा. कडेगाव, ता. वाई याच्यावर वाई पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास वाईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे या करीत आहेत.
रिपोर्टर