
साताऱ्यातील पाटखळ येथे मृतदेह आढळला
- by Reporter
- Jan 03, 2023
- 337 views
सातारा : सातारा तालुक्यातील पाटखळ येथील शीतल प्रदीप शिंदे वय ३९ यांचा ऊसाच्या शेतातील सरीत मृतदेह आढळून आला. ही घटना दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे.की, शीतल शिंदे यांचा नातेवाइक शोध घेत होते. त्यावेळी पाटखळ गावच्या हद्दीतील माळ नावाच्या शिवारातील ऊसाच्या शेतात त्या निपचीत पडलेल्या आढळून आल्या. त्यांना तातडीने रुग्ण वाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली
रिपोर्टर