खटाव तालुका येरळवाडी तलावात पट्टेरी राजहंस पक्षाचे आगमन तसेच फ्लेमिंगो पक्ष्यांचेही होणार आगमन

सातारा(अनिल करंदकर) येरळवाडी (ता. खटाव) येथील मध्यम प्रकल्पात सद्या पट्टेरी राजहंस पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे पर्यटक व पक्षीप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे यावर्षी खटाव, माण तालुक्यात पुरेसा पाऊस झाल्याने बेरळवाडी तलावात पुरेश्या प्रमाणात पाणी-साठा झाला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे.याठिकाणी जलचर वनस्पती व लहान किटक आढळून येत असल्याने नायजेरीया, युरोप,ऑस्ट्रेलीया या मध्य आशियाई देशांतून हे पट्टेरी राजहंस पक्षी हजारो किलोमिटरचे अंतर पार करून तलाव परिसरात वावरताना दिसत आहेत. सद्या येरळवाडी तलावात चार ते पाच तर सुर्याचीवाडी येथील तलावात आठ ते दहा पट्टेरी राजहंस आढळून येत आहेत. या पक्ष्यांची उंची दोन ते अडीच फूट असून ते धष्टपुष्ट शरीरयष्टीचे आहेत. रंग पांढरा व राखाडी असून त्यांच्या अंगावर राखाडी, पांढऱ्या रंगाचे पट्टे असल्याने त्यांना पट्टेरी राजहंस संबोधले जाते. हे पक्षी समुहाने राहत असून एप्रिल महिन्या अखेरपर्यंत ते तलाव परिसरात वास्तव्यास असतात. याकाळात ते येथे अंडी तयार करतात व पुन्हा मायभूमीत जावून त्याठिकाणी प्रजनन करतात.(कोरल टिवा), प्रंटीन कोल, छोटा आली, पाणभिंगरी गल्स, विविध प्रकारचे बगळेही वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहेत. येरळवाडी तलाव परिसरात 168 तर पेडगाव तलाव परिसरात शंभरहून अधिक विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. येत्या आठवडा-भरातच तलाव परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचेही आगमन होईल येरळवाडी सुर्याचीवाडी,दरजाई, पेडगाव तलावांतदेखील या पक्ष्यांचे वास्तव्य आढळून आले आहे. याशिवाय सद्या येरळवाडी तलाव रूडी शेल्डक (चक्रवाक), सैंड पायपर फ्लेमिंगोंच्या आगमनापूर्वी बेरळवाडी तलावात पट्टेरी राजहंस देखणे पक्षी दाखल झाले आहेत. तलाव परिसरात दाखल होणारे विविध प्रकारचे पक्षी हे पक्षीप्रेमी व अभ्यासकांसाठी पर्वणीच आहेत. तलाव परिसरातील जैवविविधतेचे प्रत्येकाने रक्षण करणे गरजेचे आहे.

संबंधित पोस्ट