शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख कमलाकर भोसले ( नाना) यांनी यू मे न अग्रोला. सदिच्छा भेट..

पाचगणी: शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे आपले लक्ष केंद्रित करीत आरोग्यवर्धक पिकांना प्राधान्य क्रम द्यावा. आज शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख कमलाकर भोसले यांनी नुकतीच सातारा येथील युमेन अग्रो च्या नवीन शाखेला  सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना असे आवाहन केले.

युमेन अग्रोचे संचालक श्रीरंग गलगले, यांची भेट घेतली . त्यांच्यासोबत महेश कदम, सचिन कदम,साई अग्रो कंपनी कुडाळ,चे संचालक अरुण गोळे, आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या कडून उत्पादित झालेला शेंद्रीय शेतील माल थेट युमेन अग्रो चांगल्या भावात खरेदी करते, तोच माल ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतो.

युमेन अग्रो च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सहकार्य घेत. सेंद्रिय उत्पादनाकडे वळावे. आणि आपले आर्थिक हित साध्य करावे. असे शेवटी ते म्हणाले.. 

युमेन अग्रो च्या माध्यमातून ग्राहकांना शेंद्रिय शेतीतील उत्पादित माल विक्री केला जातो. यामध्ये लाकडी घान्याचे तेल. गौ शाळेतील दूध, तसेच दुग्धजन्य पदार्थ, थेट ग्राहकांपर्यंत पोहचाविले जातात..

संबंधित पोस्ट