
अंबरनाथ येथे क्रांतीज्योती महिला प्रशिक्षण सुरू
- by Reporter
- Dec 27, 2022
- 343 views
अंबरनाथ ; ग्रामविकास विभाग,यशदा पुणे व जिल्हा परिषद ठाणे प्रस्तावित पंचायत राज प्रशिक्षण केंद्र कोसबाड यांच्या वतीने अंबरनाथ पंचायत समितीच्या सभागृहात महिला ग्रामपंचायत सदस्यांसाठी तीन दिवशीय क्रांतीज्योती क्षमता बांधणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे
आज प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन पंचायत समिती अंबरनाथ चे गटविकास अधिकारी परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले, प्रस्ताविक पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्रा राजेश लोखंडे यांनी केले गटविकास अधिकारी परदेशी,व विस्तार अधिकारी मोहेकर यांनी प्रशिक्षणाला शुभेच्छा दिल्या तर यशदा प्रवीण प्रशिक्षक तथा माजी उपसभापती महेश धानके यांनी ग्रामपंचायत मध्ये महिला सदस्यांची भूमिका यावर मार्गदर्शन दिले
रिपोर्टर