ठाणे ग्रामीण जिल्ह्यात हात से हात जोडो अभियान यशस्वीपणे राबविणार - दयानंद चोरघे

ठाणे - देशभरात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर भारत जोडोचा विस्तारीत कार्यक्रम म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हात से हात जोडो अभियान तयार केले असून 26 जानेवारीपासून सुरू होणारे हे अभियान ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व ब्लॉक मध्ये यशस्वी करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले.

भिवंडी येथे हात से हात जोडो अभियानाची नियोजन बैठक आयोजित केली होती त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून दयानंद चोरघे बोलत होते.पदयात्रा,बाईक रॅली चौक सभेच्या माध्यमातून दोन महिन्यात या अभियानामुळे काँग्रेस संघटनसुद्धा अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच जिल्ह्यात जे जुने नवे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत त्यांना जिल्हा कार्यकारिणी मध्ये समाविष्ट करण्यात येईल असेही ते म्हणाले.जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांनी हात से हात जोडो मध्ये काय करायचे आहे याचे मार्गदर्शन केले.यावेळी माजी खासदार सुरेश टावरे, यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहापुर तालुका अध्यक्ष तथा सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष  महेश धानके यांनी केले.कार्यक्रमास प्रदेश सचिव हरीचंद्र थोरात, प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले,सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रकाश भांगरथ, परशुराम पितांबरे,लता पाटील केशव लाटे,भिवंडी तालुका अध्यक्ष विजय पाटील,मुरबाड तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार,बदलापूर ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे,सोहेल खान उपस्थित होते. यावेळी ब्लॉक अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सर्व ब्लॉक अध्यक्षांना जिल्हा अध्यक्ष यांनी निवड पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.उपस्थित सर्वांनीच हात से हात जोडो अभियान जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प केला.बैठकीत २०० पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट