नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी भारतीय लहुजी सेना एकत्र येणार!.अंकुश घेरे यांची माहिती !

नवी मुंबई : येत्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान  नवी मुंबई मध्ये पीपल्स  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय  लहुजी  सेना एकत्र येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अंकुश घेरे यांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची पक्षाच्या मुंबई कार्यालयात  भेट घेऊन प्राध्यापक कवडे यांच्याबरोबर सकारात्मक  सविस्तर चर्चा  झाल्याची  माहिती  दिली भीमशक्ती आणि लहुजी शक्ती एकत्र आणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे  तशीच सुरुवात करण्याचा निर्धार अंकुश घेरे यांनी व्यक्त केलेला आहे

दरम्यान: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय लहुजी शक्तीची ताकद बऱ्याप्रमाणे आहे   बौद्ध, आणि दलित, वस्ती मोठ्या प्रमाणात आहेत 

 इतर प्रस्थापित पक्षाचा उमेदवार देखील या वस्त्यांचा आधार घेऊनच निवडणुकीच्या रणनीती आखात असतात किंबहुना याच निर्णयक मतावरती त्यांचे राजकीय पुढील भविष्य अवलंबून असते. जर भीमशक्ती आणि लहुजी शक्ती एकत्र आल्यास प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांच्या राजकीय  भविष्याला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकत भिम शक्ती आणि लहुजी शक्ती मध्ये नवी मुंबईमध्ये नक्कीच असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केलेले आहे.

संबंधित पोस्ट