संघटन बांधणीसाठी झोकून देऊन काम करा - राजेश शर्मा

शहापुर मध्ये काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

शहापुर :   भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेससाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे,नवी माणसे जोडून जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी पदयात्रा,बूथ बांधणी आणि आंदोलन यावर भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा ठाणे ग्रामीण जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांनी केले आहे.शहापुर तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज देशमुख वाडा,शहापुर येथे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना राजेश शर्मा बोलत होते.जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनीही ठाणे ग्रामीण जिल्ह्यात काँग्रेस संघटन वाढले असून कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कामाला लागा असे आवाहन चोरघे यांनी केले.बैठकीचे प्रास्तविक तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी केले.यावेळी नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला तर पर्यावरण काँग्रेसच्या वतीने तालुका कार्यकारिणी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आढावा बैठकीत सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रकाश भांगरथ, प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले, जान्हवी देशमुख,अपर्णा खाडे,कांता तारमले,मल्हारी कोळेकर,शिवराम मोगरे,रामचंद्र जोशी यांनी भाग घेऊन आपली मनोगते व्यक्त केली.

बैठकीस पद्माकर केव्हारी, आबा देशमुख,दत्ता बरोरा,जितेश विशे,अंकुश भोईर,महेंद्र आरज,संतोष मुकणे,संजय तांबोळी,राम वाघ,दशरथ तारमले लक्ष्मण निचिते,पद्माकर वरकुटे, जयदीप देशमुख शांताराम धामणे,श्रीपत संगारे, देवेन्द्र भेरे,वसंत तारमले,संतोष पडवळ,सविता पंडित,ज्योती परदेशी,संतोष पांढरे, यांच्यासह अनेक तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट