महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त गरजू व गरीब नागरिकांना अन्नदान

ठाणे : इंग्रजांना तब्बल १८ वेळा लढाईत हरवणारा व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले,भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महायुद्धा महापराक्रमी,महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर प्रतिष्ठानच्या वतीने गरजू व गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने ठाण्यातील जांभळी नाका,मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे जयंती निमित्त महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय जवळ गरजू व गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोहर अंचुळे समाजाचे जेष्ठ नेते बाबासाहेब दगडे,शंकर कोळेकर,पोलीस अधिकारी संजय कोकाटे राज्य उत्पादन शुल्क पोलीस उपनिरीक्षक गोविंद पाटील,प्रशासकीय अधिकारी सुखदेव खांडेकर,बाजीराव शिरगिरे, महापालिका अधिकारी कालिदास धनगर,रमेश शिंगाडे, भाजपाचे प्रभाग अध्यक्ष संदीप माने,भटक्या विमुक्त आघाडी महिला अध्यक्ष वर्षा माने, डी के खरात,धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर,आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष महेश गुंड,खजिनदार अविनाश लबडे,सल्लागार मनोहर वीरक विरकर,सूर्यकांत रायकर,सुनील राहींज कार्यकारणी सदस्य उत्तम यमगर,अंकुश उघाडे,उद्धव गावडे,महेश पळसे,महिला मंडळाच्या सुषमा बुधे,सुजाता भांड,प्रविण शेंडगे,सुदेश भादेकर.मंगेश पोंदे आदींनी मेहनत घेतली.

संबंधित पोस्ट