वंचित बहुजन आघाडी, कळवा विभागाचे वतीने खारेगाव, कळवा येथे ' संविधान गौरव दिन' साजरा !

नवी मुंबई : २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे  औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी तर्फे  रेतीबंदर चौक ते भाविका विद्यालय, खारेगाव अशी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. सदरची रॅली कळवा विभागात प्रथमच काढण्यात आली.

संविधान  रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खारेगाव,घोलाईनगर,आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर,विटावा, महात्मा फुले नगर, मनिषा नगर, साईनाथ नगर, रेतीबंदर, मुंब्रा तसेच ठाणे येथील कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. यावेळी सदरचा रॅलीमध्ये अनेक समाजातील आणि कार्यकर्त्यांनी संविधान जिंदाबाद नारा देत संविधानाला अभिवादन केले सदरचा रॅलीमध्ये इसाक बिराजदार सामाजिक कार्यकर्ते, मंगेश आवळे अध्यक्ष मराठा सेवा संघ जिल्हा ठाणे, अनिल नलावडे उपाध्यक्ष मराठा सेवा संघ ठाणे शहर, प्रफुल्ल वाघोले निमंत्रक ठाणे ओबीसी एकीकरण समिती ठाणे, राजाराम ढोल़म ओबीसी नेते, संजय भालेराव पत्रकार, मधूकर कांबळे चर्मकार समाज, तुकाराम माने वडार समाज नेते, वंदना हिरे अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा शाखा खारेगाव व त्यांचे महिला मंडळ , तूषार कांबळे अध्यक्ष बौद्ध जन पंचायत शाखा खारेगाव तसेच पदाधिकारी संतोष येळवे, प्रकाश कांबळे, संतोष खांबे, नामदेव जाधव  तसेच अशोक पवार अध्यक्ष बहुजन सामाजिक विकास संस्था खारेगाव, तसेच वंचित बहुजन आघाडी चे जयवंत बैले उपाध्यक्ष ठाणे जिल्हा, ॲड विलास सूर्यवंशी संघटक जिल्हा ठाणे, बी.बी.प्रधान मा.प्रवक्ता जिल्हा ठाणे, सुनील पगारे मा.संघटक जिल्हा ठाणे, महेंद्र जाधव मा.सचिव जिल्हा ठाणे, भीमराव सपकाळ मा.सचिव जिल्हा ठाणे, परमेश्वर उबाळे संघटक ठाणे शहर, दयानंद गायकवाड संघटक ठाणे शहर, डॉ शशिकांत शिंदे उपाध्यक्ष ठाणे शहर, प्रताप जाधव ठाणे शहर, रघु भोसले उपाध्यक्ष ठाणे शहर, संदिप खरात उपाध्यक्ष ठाणे शहर, बंडू व्हावळे मा. उपाध्यक्ष ठाणे शहर, कल्पना ताई सुर्यवंशी मुंब्रा अध्यक्षा महिला विभाग, नेहा खरात महासचिव ठाणे शहर महिला विभाग, वंदना बेटकर अध्यक्षा आतकोणेश्वर नगर  आणि त्यांचे महिला मंडळ, विजय बेटकर,  ए.आर.पटेल संघटक ठाणे शहर, वंचित बहुजन आघाडी वडूज सातारा चे नगरसेवक तूषार बैले, संदिप बनसोडे अध्यक्ष कळवा विभाग, नितीन माने उपाध्यक्ष कळवा विभाग, निलेश सुरवाडे महासचिव कळवा विभाग, ज्ञानेश्वर तायडे सल्लागार कळवा विभाग, कुंदन दिलपाक आय.टी. कळवा विभाग, राजेश जाधव, ॲड. देविदास वाघमारे, चंद्रकांत मोरे, चंद्रकांत बर्वे, मिलिंद चन्ने सर, डॉ. मिलिंद चन्ने, ॲड किरण चन्ने, विजय यादव, मेजर शिवशरण, मिलिंद शिरसाट, निळे गुरुजी, दिनेश चव्हाण, अभिमन्यू साबळे, दिनकर आरकड, वसंत आढाव , सुरेश गायकवाड, सुधीर हिरे, दयानंद पवळ, अनिल खरे , सागर कांबळे, मिलिंद मोहिते, आण्णा भंडारे , सुभाष मिसाळ, नितीन तायडे, धम्मपाल शिरसाट, कमलेश साकरे, जनार्दन इंगळे, गोविंद पाठारे, राहूल घोडके , अमर आठवले, जितेंद्र अडबले, वैभव जानराव , सतिश कनोजिया, आतिश रायबोळे, ज्ञानेश्वर गरूड,   रवी कांबळे, विजय वाघमारे, महेंद्र जयस्वाल, राहूल जयस्वाल , संतोष ढवळे, सौ.गायकवाड व त्यांचे साईनाथ नगर येथील महिला मंडळ तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

रॅली मध्ये कार्यकर्ते यांनी उत्साह पूर्वक सहभाग घेतला.भाविका विद्यालय, खारेगाव येथे रॅली चे रूपांतर सभेत झाले. सभेला प्रमुख वक्ते इसाक बिराजदार सामाजिक कार्यकर्ते यांनी संविधान विषयक मार्गदर्शन केले तसेच मंगेश आवळे, बी.बी.प्रधान , तुषार बैले, राजाराम ढोल़म, ॲड किरण चन्ने यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर तायडे यांनी सूत्रसंचालन केले. 

दरम्यान २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहिद झालेल्या भारतीय जवानांना व नागरीकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

संबंधित पोस्ट