ठाणे महानगरपालिका हे भूमाफिया चालवतात की अधिकारी असं प्रश्न आता ठाणेकरांमध्ये निर्माण

ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत माजीवाडा ट्रॅफिक पोलिस चौकी समोर बांधण्यात आलेले ६ अनधिकृत गाळे हे २०/१०/२०२२ रोजी माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभागाने पूर्णपणे जमीनदोस्त करून कारवाई केली होती.

कारवाई होऊन एक महिना तरी संपला नाही आणि परत त्या ठिकाणी हे अनधिकृत गाळे उभारण्यात आले आहे. हे गाळे परत उभारण्यासाठी ठाणे महानगरपालिकाचे वसुलीखोर लिपिक महेश आहेर यांनी त्याच्या निकटवर्गिय सुशांत सुर्वे याचा माध्यमातून २५ लाख रुपये घेऊन हे अनधिकृत गाळे उभारण्याचा विक्रम केला आहे अशी स्थानिक लोकांमध्ये चर्चा आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर सहसचिव अक्षय करंजवकर यांनी या अनधिकृत गाळे बांधण्यासाठी विरोध केल्याने त्यानं सुशांत सुर्वे यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. त्यांनी सदर धमकीबाबत ठाणे पोलिस आयुक्त यांना लेखी पत्र दिले आहे. ठाणे महानगरपालिका हे भूमाफिया चालवतात की अधिकारी असं प्रश्न आता ठाणेकरांमध्ये निर्माण झाला आहे.



संबंधित पोस्ट