राम के नाम, शिवसेनाचा पुन्हा महाआरतीचा जप

राज तिलक की करो तयारी आ रहे है भगवा धारी, गर्व से कहो हम हिंदू है, सौगंध राम की खाते है मंदिर वही बनाएगे, श्री रामचंद्र की जय, भारत माता की जय अशा घोषणांचा गजर करत शिवसैनिक आणि सर्व नागरिकांनी या सामूहिक आरतीत सहभागी होण्याचे आदेश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत.


 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार'चा नारा देत शिवसेनेने अयोध्याकडे कूच केली आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या २४ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता अयोध्येत शरयू तिरावर महाआरती करणार आहेत. याचवेळी मुंबईतील ८ लोकसभा क्षेत्रासह राज्यातील ३५० तालुक्यात एकाचवेळी महाआरती होणार आहे.
अयोध्येत उद्धव आणि इकडे कार्यकर्ते राम मंदिरचा गजर करत मुंबईतही राम मंदिरचा मुद्दा तापणावर आहे. याची विशेष जबाबदारी युवासेना व महिला आघाडीच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. १९९२ ला जेव्हा अयोध्येत बाबरी मशीद तोडली होती, त्यावेळी मुंबईत शिवसेनेकडून महाआरतीच लोण पसरले होते. त्याच धर्तीवर २६ वर्षांनी मुंबईत महाआरतीचे लोण पुन्हा एकदा पसरणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह १०० निवडक नेते अयोध्येला रवाना होणार आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट