
शिवसेनेच्या वतीने विज वितरणाचा भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे निवेदन.
- by Reporter
- Nov 14, 2022
- 308 views
सातारा : खटाव आणि माण हे दोन तालुके कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून माथ्यावर कलंक घेऊन च जणु काही तयार झालेले आहेत. त्यात दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत सर्व सामान्य जनतेला दिवस काढावे लागतात. अशा परिस्थितीत आणखीन विज वितरण कंपनीच्या माध्यमातून वाढते अवाजवी बिल , कोटेशन भरुन अनेक वर्षे कनेक्शन न मिळणे ,कोटेशन भरुन कनेक्शन नसुन उलट लाईट दिलं जात आहे , याविषयी तक्रार करायला गेलेल्या नागरीकांचे ऐकुन सुद्धा न घेणे,घरचा मिटर बंद असुन कायमच्या बिलापेक्षा अनेक पटीने लाईट बिल जास्त येणे , बंद पडलेला मिटर नवीन मिळण्यासाठी अनेक हेलपाटे घालुन सुद्धा नवीन मिटर दिला जात नाही., नियमापेक्षा अनेक पटिने वाढुन आलेलं लाईट बिल कमी करण्यासाठी सर्व सामान्य माणूस गेला तर अरेरावीची भाषा ऐकायला लागणे.
अशा एक ना अनेक अडचणी सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या समोर विज वितरण कंपनीच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात निदर्शनास आलेल्या आहेत. यासाठी आज रोजी शिवसेनेच्या वतीने मायणी ता खटाव येथील संबंधित अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना खटाव तालुका संघटक माणिकराव घाडगे (महाराज). मायणी गट प्रमुख विशाल चव्हाण , मायणी शहर प्रमुख फिरोज मुलाणी ,लखण ,माळी , अर्जुन कठरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
जर येणाऱ्या नजीकच्या काळात या परिस्थीतीत संबंधित विभागाच्या कामकाजात काही फरक पडला नाही तर मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन मोठ्या प्रमाणात निदर्शने,आंदोलनं करून संबंधित विभागाला कायमची जाग आणुन देण्याचा प्रयत्न केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
रिपोर्टर