
श्री.संत गजानन महाराज पट्टेकर यांचा पुण्यतिथीउत्सव चैतन्यमय वातावरणात संपन्न!
- by Reporter
- Oct 20, 2022
- 408 views
ठाणे - सिध्देश्वर संत श्री गजानन महाराज पट्टेकर उर्फ श्री अण्णासाहेब पट्टेकर महाराज उर्फ श्री बालानंद महाराज, यांचा ३२वा पुण्यतिथीउत्सव,महाराज ज्या स्थानावरून भाविक भक्तांना मार्गदर्शन करायचे,त्या श्री गिरीधर उर्फ बाबा तेली यांचे,"हेमंत" निवासस्थान, एदलजी रोड,टेंबी नाका ठाणे(पश्चिम) स्थानी अतिशय श्रध्दा-प्रेम-भक्तिभावाने,चैतन्यदायी वातावरणात आज गुरुवार,दिनांक २० ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यावेळेस सर्वाना प्रसाद देण्यात आला.त्याच प्रमाणे कल्याण येथील श्री.संत राममारूती महाराज मंदिरातील, श्री.संत गजानन महाराज पट्टेकर उर्फ श्री.संत अण्णासाहेब पट्टेकर महाराज यांची सुंदर संगमरवरी मूर्तिवर अभिषेक व पुजा करण्यात आली.
रिपोर्टर