दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर मध्ये रक्तदान शिबीर

शहापूर ; ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष व डी. वाय. फाउंडेशन चे संस्थापक दयानंद मोतीराम चोरघे यांच्या - शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ रोजी शहापूर मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.


हापूर तालुका काँग्रेस कमिटी,लोक हिंद वृत्तवाहिनी व डी वाय फाउंडेशन तर्फे प्लाझ्मा ब्लड बँक डोंबिवली यांच्या सहकार्याने दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस जनसंपर्क कार्यालय,देशमुख वाडा शहापूर येथे शनिवार दिनांक २२ रोजी सकाळी ९ ते ३ यावेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले असून रक्तदाते व काँग्रेस कार्यकर्ते आणि लोक नेते दयानंद मोतीराम चोरघे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक महेश धानके, रवींद्र परटोले,रामचंद्र जोशी,अंकुश भोईर,संजय तांबोळी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट