
एसटी बसमध्ये तरुणीसोबत अश्लील चाळे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृत्याने साताऱ्यात खळबळ
- by Reporter
- Oct 18, 2022
- 430 views
सातारा:साताऱ्यात काल एक खळबळजनक घटना घडली. सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीची कोल्हापूर पोलीस दलातील एकाने बसमध्ये छेड काढली. कोल्हापूर पोलिस दलातील महेश मगदुमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या पोलिसाने तिच्या सोबत आश्लिल चाळे केले. याबाबत त्या मुलीने आपल्या पालकांना घडलेल्या घटनेची महिती दिल्याने पालकांसोबत तिचे मित्र मैत्रीणी कराड बस स्थानकात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीची कोल्हापूर पोलीस दलातील एकाने बसमध्ये छेड काढली. कोल्हापूर पोलिस दलातील महेश मगदुमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या पोलिसाने तिच्या सोबत आश्लिल चाळे केले. याबाबत त्या मुलीने आपल्या पालकांना घडलेल्या घटनेची महिती दिल्याने पालकांसोबत तिचे मित्र मैत्रीणी कराड बस स्थानकात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.
दरम्यान संबधित युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडीलांसह मित्र मैत्रिनींना दिली. कराड एसटी स्टॅन्डवर पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांसोबतच पोहचले. छेड काढणाऱ्याला ताब्यात घेतले. संबधित हा कोल्हापूर जिल्हात पोलिस खात्यात असून तो पोलिस खात्यातील खेळाडू आहे. सातारा शहरात सुरू असलेल्या पोलिसांच्या स्पर्धेसाठी तो आला होता. या पोलिसाचे नाव महेश मगदूम असे आहे.
रिपोर्टर