
गुजरात मध्ये हजारों लोकांनी घेतली बौद्ध धम्म दीक्षा
- by Narendra Nashikkar
- Oct 18, 2022
- 587 views
अशोका विजयादशमी दिनी राजकोट,पोरबंदर, जुनागड, जामनगर, जि. गिरसोमनाथ येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांनी, जपान येथील भन्ते जशेनसूर तेरेसावा व भन्ते पराग रत्न यांच्या हस्ते घेतली बौद्ध धम्माची दीक्षा. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने जय-भीम मिशनचे अध्यक्ष भानुभाई चौहान, समता सैनिक दल गुजरातचे पदाधिकारी व जेसिंग जोगडिया यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला. भारत बौद्धमय करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आमचे धम्म प्रसाराचे कार्य अखंड चालूच राहणार असून असा निर्धारही मान्यवरांनी केला.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम