
नवी मुंबईत, संविधान जागृती अभियानाची तयारी
नवी मुंबई : सी. बी. डी. बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात नवी मुंबईतील विविध सामाजिक, संस्था व कार्यकर्त्यांनी संविधान जनजागृती करण्यासाठी एकत्र येवून येत्या संविधान दिना पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन केले असून त्या संंबधीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दि. ०९/१०/२०२२ रोजी पार पडली.
पी. ई. एस. शिक्षण संस्थेचे प्राचार्य आयु. भास्कर पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नवी मुंबईतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत संविधान मित्र, लोटस संस्था व महिला बचत गट, अखिल भारतीय नाथपंथी समाज, नुतन एकता मंडळ व महिला बचत गट, सीबीडी पोलिस व महिला बाॅईज संघ मूलनिवासी संघ ,लातूर परिवार,जागृत भारतीय संघ आणि संविधान जागृती शिक्षक मंच इ. नवी मुंबईतील संस्था व संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम