जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त
- by Adarsh Maharashtra
- Nov 22, 2018
- 728 views
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये आज राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण लागलं. पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केलेला असतानाच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या मेहबूबा मुफ्ती यांच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम